बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बा.सी.मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. त्यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला.मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात. केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. मा.मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ते समीक्षक म्हणूनही प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ मा.बा.सी.मर्ढेकर यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.*बा.सी.मर्ढेकर* यांचे २० मार्च १९५६ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बा.सी.मर्ढेकर यांची ग्रंथसंपदा:
रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्यास आणि ‘सौंदर्य आणि साहित्य’ ‘वाड्मरयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत.
मा.बा.सी. मर्ढेकर
दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; – मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!
दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
Leave a Reply