अरुणा शानबाग… हे नाव ऐकलं तरी धस्स व्हायला होतं… ३७ वर्ष मरण यातना सोसत शय्येवर कदाचित ती मरणाचीच वाट पाहत असावी ती… पण देवाच्या मनात तरी काय असावं ? नियती काय खेळ खेळतेय तिच्या आयुष्याशी ? असे प्रश्न साधारणपणे आपल्या सगळ्यांनाच पडतात.. पण काही प्रश्न अनुत्तरीत
असतात.. मात्र अरूणाच्या मैत्रिणीला पिंकी विराणीला तिची अवस्था बघवली नाही आणि पिंकीने अरूणाच्या दयामरणाची याचिका न्यायालयात दाखल केली.. आणि ती सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळली..
न्यायालयाचा निर्णय नक्कीच योग्य असेल.. आहे .. पण तरीही भावनिक पातळीवर जाऊन फक्त अरूणाचाच विचार करायला तर मला हेच वाटत का तिने या मरण यातना भोगाव्यात? जर तिला जगण किंवा जगायचं समजत नसेल तर फक्त तिच्या श्वास घेण्याला जगण म्हणायचं? ती आयुष्याचे जेम तेम २५ वर्ष जगली असेल.. त्याहून जास्त काळ ती जाणीव अजाणीवततेच्या गर्तेत झोपली आहे.. मला नाही वाटत मी किंवा कोणीही आपल्या आप्तेष्ठांना या असा अवस्थेत पाहू शकत नाही …मग का नाही मिळत तिला मरण?मला कल्पना आहे की हा फक्त अरूणाचा जगण्या मरणाचा निर्णय न्यायालयाला द्यायचा नव्हता अरूणाची केस हे तिच्या सारख्या जीवंत तरीही मृत असलेल्या अनेक शरीरांच काय करायाचं हा निकाल लावणार होती.. डॉक्टर आणि पेशंट या नात्याचाही प्रश्न होता.. अशा कित्येक बाजुंनी बावरलेली अरुणा शानबाग…ही केस.. पण परत परत एक व्यक्ती म्हणुन मला हेच वाटत या मरण यातनेतून तिची सुटका मृत्यूच करू शकतो…. आज एका वृत्त वाहिनीवर अरूणाचा कोर्टात दाखवलेला व्हिडिओ बघितला.. मन हेलावलं.. पिंकीची याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दयामरण न देण्याचा निर्णय घेतला. देवाच्या दरबारी तरी लवकरात लवकर तिला दयामरण मिळू देत.. हीच प्रार्थना…
— स्नेहा जैन
Leave a Reply