नवीन लेखन...

दलाल नावाचे बोन्साय………

परवाच एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या कार्यालयात मुलाखतीसाठी गेलो होतो. अर्थात माझ्या वयाच्या तरुण पोरांना अशा मुलाखती नविन नसतातच. तशी ही मुलाखतसुद्धा माझ्यासाठी नविन नव्हती. मुलाखती दरम्यान तावुन सुलाखुन निघालेली आजची पिढी. जीवनाचे रहाट गाडगं यंत्रवत होत चाललेल्या व्यवस्थेमध्ये ढकलायचं आणि रेटत रहायचा आयुष्यभर आपल्या निरागस “जिंदगीचा” गाडा अविरतपणे. डोक्यावर सतत टांगती तलवार किंवा मग मनाच्या पृष्ठभागावर सतत आदळत रहाणार समस्या नावांचा एक प्रचंड हातोडा. सध्या आपल्याकडे खाजगी आणि शासकीय क्षेत्रात जो भ्रष्टाचार बोकाळतोय त्याच्याचबरोबर दलाल नावाचे बोन्सायही वाढवले जातायेत किंबहुना वाढतायेत. व्यवस्थेने मांडून ठेवलेलं पंचपक्वानाचं ताट जर खालच्या पायरीवरील माणसांपर्यंत पोहोचायचं असेल तर शासनयंत्रणा आणि सामान्य माणूस यांच्या दरम्यानच्या अंतरात जी दलाल नावाची जी बोन्साय वाढवले जात आहेत ते मुळासकट छाटून टाकले पाहिजेत. “बोन्साय” हा शब्द अशासाठी वापरलाय की, दलालांची ही लॉबी छुप्या पद्धतीने कामं करते. जरी या दलालांची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्यातील कामचं नियोजन इतक्या सूक्ष्म स्वरुपात चालतं, की पुढे यांच्या बोन्साय नावाच्या झाडाला खतपाणी घालत गुलामगिरी पत्करण्याची वेळ आपल्यावर येते आणि अशा व्यवस्थेच्या कंगोर्‍यात एकदा आपण सापडलो की, सतत काही ना काही देण्याची जी सवय आपल्याला लागते त्यातुन लवकर सुटणं किंबहुना बाहेर पडणं आपल्या सारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही. असो.

तर मी सांगत होतो वृत्तपत्राच्या कार्यालयातील गोष्ट, प्रत्यक्षात ज्या पदासाठी मुलाखत घेण्यात आली त्या पदासाठी मी प्रामाणिक मुलाखत दिली. पण, मुलाखत घेते मला असं म्हटले की, “तुमच्या कामाचा एकंदर आढावा इतका सच्चा आणि स्वच्छ आहे की या पदा ऐवजी आपणांस यापेक्षा उच्च पद दिले तर? मी म्हटलो, “जरुर, मी (निभावून) आपण सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावुन नेईन.” मुलाखत घेत्याने वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावाने पत्र लिहिलं, त्या मजकुरात मला पदोन्नती मिळावी अशी शिफारस करण्यात आली होती. मी कार्यालयात बसुन राहिलो. थोड्याच वेळात वरिष्ठ अधिकारी आले. माझ्या कामाची माहिती त्यांच्या पर्यंत पोहोचली. पण, प्रत्यक्षात अधिकार्‍यांच्या कचेरीपर्यंत मध्ये जे कोणी दलाल नावाचे बोन्साय वाढवले होते त्यांनी मला जाऊ दिलं तर नाहीच. पण, अधिकार्‍यांबरोबर बोलुही दिलं नाही. प्रत्यक्षात या बोन्सायांच्या मनात काय होतं, त्याचं अंतरंग मी ओळखू शकलो नाही. पण, माझा प्रयत्न प्रामाणिक होता आणि यांवर माझा पूर्ण विश्वास होता. मग अशा प्रयत्नाचं फलित जर इतक्या चांगल्याप्रकारे मिळणार असेल तर आमच्या सारख्या तरुणांनी डोळ्यासमोर कोणाचा आदर्श ठेवायचा? चिड याच गोष्टीची येते की, आमच्या मागच्या पिढीने व्यवस्थेच्या अशा कचाट्यात सापडू नये आपली निश्चित सुटका व्हावी त्यासाठी अशा दलाल नावाच्या बोन्सायला सतत खतपाणी घालण्याची जी वाईट सवय लावली आहे, ती आधी मुळासकट उखडून टाकली पाहिजे आणि मग हे दलालांचे बोन्साय. तरच ही व्यवस्था सामान्य माणसांपर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पंचपक्वानाच जेवणाचे ताट पोहचु देईल. मी मानतच नाही की, शासन आपल्यासाठी काहीच करत नाही. उलट शासनामार्फत अनेक सोई सुविधा निर्माण केल्या जातात, त्या आपल्यापर्यंत प्रमाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, या बोन्सायांची कुरणंच नष्ट केली तर या सुविधा आपल्यापर्यंत नक्कीच प्रामाणिकपणे पोहोचतील. आणि सामान्य माणसांमध्ये शासकीय असो वा खाजगी क्षेत्र असो कुणाबद्दलही विश्वास निर्माण होऊ शकतो आणि ती सुरुवात आमच्या पिढीपासून नक्कीच सुरु होईल याबद्दल शाश्वती वाटते.

— प्रकाश बोरडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..