दशनाम गोसवी समाज महाराष्ट्रातील खेडोपाड्यात पसरलेला असल्याने तेथे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते.त्यामुळे समाजातील वधू-वरांसाठी हवे तसे जोडीदार मिळत नाहीत. दशनाम गोसवी समाजाचे राज्य संपर्क प्रमुख श्रीराम परबत यांनी यावर एक नामी उपाय शाधून काढला आहे.घरबसल्या विवाहयोग्य वधू-वरांची निवड करता यावी म्हणून फोनवर मोफत माहिती उपलब्ध करून
दिली आहे.
तसेच जानेवारी अखेर पूणे येथे मोफत वधू-वर मेळावा आयोजित केला असुन गरीब व होतकरू मुलांमुलींचे मोफत विवाह लावण्यात येणार आहेत. तरी इच्छुक व गरजू वधू-वरांनी अधिक माहितीसाठी-९८५०९९९७८७ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि या संधीचा फायदा समाजाने घ्यावा असे आवाहन निवेदनाद्वारे गोसवी समाज महासंघाने केले आहे.
— संदीप लिंभोरे
Leave a Reply