नवीन लेखन...

दिपस्तंभ विवेकानंद

 लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्रीहे मातृभूमी तुजला मन वाहियलेवकृत्व वाग्वीभवही तुज अर्पियलेतुतेची अर्पिली नव कविता रसालालेखाप्रती विषय तुच अनन्य झालासन्माननिय हिंदु बंधू आणि भगिनींनो, असा काळ ज्या काळी पाश्चात्य विचार, पाश्चात्य आचार, साहित्य, विद्दा यांचा एकंदर भारतावर प्रभाव निर्माण झाला होता. या पाश्चात्य विचारांच्या लाटेत इतका प्रभाव होता

की भारतिय संस्कृतीवर प्रलय आले असते. हे प्रलय थोपवून लावण्यासाठी एक अगस्ती हवा होता आणि १२ जानेवारी १८६३ साली महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि विवेकरुपी अगस्ती अवतरला. तो आधूनिक अगस्ती तो दिपस्तंभ म्हणजेच स्वामी विवेकानंद. विरेश्वर हे त्यांचे पाळण्यातले नाव, लाडाने त्यांना बिले असे म्हटले जात. शाळेत गेल्यावर नरेंद्रनाथ हे नाव आले, नरेंद्रनाथाचे संक्षीप्त बंगाली उच्चार नोरेन असे झाले. पुढे विवीदिशानंद, सच्चिदानंद आणि सर्वधर्म परिषदेत गेल्यावर विवेकानंद हे नाव धारण केले. इतका जाज्वल्य प्रवास आहे त्यांच्या नावांचा. परंतू त्यांच्या या नावांचा प्रवास आपल्याला माहीत नसतो. कारण आपण म्हणतो नावात काय आहे? म्हणे शेक्सपीयर असं म्हणाला होता. परंतू हे ध्यानात ठेवा श्रोत्यांनो, शेक्सपीयर ज्या देशात जन्माला आला त्या निरर्थक नावे ठेवण्याची प्रथा आहे. पण आपल्या भारतात प्रत्येक नावाला अर्थ आहे. आता आपले नाव सार्थक करायचे की लोकांनी आपल्याला नावे ठेवायची, हे आपलं आपण ठरवायचं, असो. विवेकानंदांना ३९ वर्षांचे अल्पायुष्य लाभले होते. परंतु ३९ वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी जे जे कार्य केले आहे ते एखाद्दा माणसाला ७ जन्मात सुद्दा करता येइल की नाही यात शंका आहे. इतके अफाट आणि विलक्षण कार्य आहे. त्यांना भारतिय संस्कृतीचा प्रचंड अभि
ान होता. एकदा एका गोर्‍या माणसाने त्यांना विचारले “स्वामीजी तुम्ही सुशिक्षीत आहात, दिसायलाही सुंदर आहात, पण तुम्ही असे गावंढळ लोकांसारखे कपडे का घालतात? जेंटलमॅनसारखे, सभ्य लोकांसारखे कपडे का नाही घालत?.” यावर स्वमीजी म्हणाले, “तुमच्या देशात कपड्यांवरुन सभ्यता ओळखले जाते, पण आमच्या हिंदु राष्ट्रात सभ्यता ही चारित्र्यावरुन ओळखली जाते.” या एका वाक्यात स्वामीजींनी भारताच्या संस्कृतीचं दर्शन घडवले आहे. स्वताच्या धर्माबद्धल किती अभिमान असावा हे विवेकानंदांकडून आपल्याला शिकले पाहिजे. धर्माभीमान कसा असावा याबद्दल एक द्रूष्टांत सांगतो, २६/११ ला मुंबईत आतंकवादी हल्ला. पारसी डेअरीच्या परिसरात एक ज्यू कुटूंब या हल्ल्यात सापडले. सगळे कुटूंब मारले गेले, परंतु एक लहान मूल वाचले. त्या लहान मुलाला त्याच्याच घरी काम करणार्‍या एका मराठी हिंदु मोलकरणीने वाचवले. ही घटना घडली मुंबईत पण ही बातमी थेट इज्रायलला जाऊन धडकली. इज्रायल सरकारने त्या मोलकरणीला इज्रायलमध्ये बोलावले. तिचा येण्या-जाण्याच सगळा खर्च इज्रायलने केला. एखाद्दा पंतप्रधानाचे, राष्ट्राध्यक्षाचे स्वागत होणार नाही, असे स्वागत तिचे करण्यात आले. हे तर काहीच नाही, तिला बक्षीस म्हणून ५ कोटी रुपये देण्यात आले. पाच कोटी, कोणाला तर हिंदु मोलकरणीला, का? कशासाठी? तर एका ज्यू मुलाचा जीव वाचवला म्हणून. ह्याला म्हणतात धर्माभिमान. म्हणून तर त्यांचे मुंगी एवढे राष्ट्र टिकून आहे. आपल्याला मात्र धर्माभिमान नाही. आपल्या सरकारला माणसांची पर्वाच नाही. हिंदुंची तर नाहीच नाही. लोक विचारतात हिंदु म्हणजे काय? जे हीन आहे ते दूर करतो तो हिंदु. जे वाईट, जे आसूरी, जे सात्वीक नाही ते टाकून देतो तो हिंदु. मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वताच्या प्राणांची पर्वा न करता क्रांतीच्या यज्ञात स्वताची आहूती देतो तो हिंदु. हिंदुत
वाशीवाय जगाला पर्याय नाही. स्वता स्वामी विवेकानंद म्हणाले होते, “तरुणांनो हे राष्ट्र जीवंत रहावं अशी आपली धडपड असेल तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्टीत जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे.” असा स्वामीजींचा आग्रह होता. काही लोक हिंदु धर्म नष्ट करण्याची भाषा करतात. हिंदु धर्म नष्ट करणे इतके सोपे नाही. “सारथी जिचा अभिमानी, कृष्णजी अणी राम सेनानी, अशी कोटी कोटी तव सेना, ती आम्हावीन थांबेना.” असम सावरकरांनी म्हटलंय ते उगाच? उगाच नाही. अहो जिचा सारथी स्वता भगवान श्रीकृष्ण आहे, जिचे सेनापती स्वता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहेत, अशा भारतमातेचा, अशा हिंदु धर्माचा पराभव कसा होईल? अशक्य केवळ अशक्य, पण. पण जेव्हा जेव्हा प्रत्येक माणूस, मी आणि माझी जात, मी आणि माझं कुटूंब, मी भला माझं काम भलं, अशा संकूचीत मनस्थितीत मग्न झाला तेव्हा तेव्हा आपले राष्ट्र पारतंत्र्यात गेले आहे. हे दुर्दैव आहे परंतु सत्य आहे. आपण म्हणतो भारत हे एक गौरवशाली राष्ट्र आहे. मान्य, सगळ मान्य. पण या गौरवशाली राष्ट्रात काही दुर्भाग्यशाली नागरिक राहतात, त्याचं काय? विवेकानंदांना हेच तर नको होतं आणि आता हेच होतंय. स्वामीजींची इच्छा होती की प्रत्येक माणसावर लहानपणापासूनच राष्ट्राचे संस्कार केले पाहिजेत. जर असे झाले तर तुम्ही जे चालाल तीच प्रदक्षीणा असेल, तुम्ही के काही कराल तीच राष्ट्रसेवा असेल, तेच धर्मकार्य असेल. वेगळं काही करायची गरज नाही. स्वामीजी म्हणाले होते, “अजून पन्नास वर्ष आपण एकही मंदिर बांधलं नाही तरी चालेल, अजून पन्नास वर्ष आपण शंकराला बिल्वपत्र वाहिलं नाही तरी चालेल. आता पन्नास भारत हेच तुमचे मंदिर होऊ द्दा, आता पन्नास वर्ष भारतातील गोर-गरीब जनता हाच तुमचा परमेश्वर होऊ द्दा.” काय सुंदर आणि सात्विक विचार आहेत. शेवटि माऊलीच ती. विवेकानंदांच्या शैलीत स
ांगायचे झाले तर, आपण स्वामी विवेकानंदांची जयंति साजरी नाही केली तरी चालेल, याचा अर्थ असा नाही की साजरी करु नये. एकवेळ साजरी नाही केली तरी चालेल. पण विवेकानंदांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हीच खर्‍या अर्थाने विवेकानंदांना

श्रद्धांजली आहे, आदरांजली आहे. जर असे झाले नाही तर सगळे व्यर्थ आहे. पण आपण सकारात्मक विचार करु, उद्दाचा उगवणारा सुर्य अखंड हिंदुस्थानात असेल, हेच लक्ष्य ठेवून, हेच ध्येय घेऊन आपण जगू आणि स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र स्थापन करू. हिंदु जातीलाच नव्हे तर सबंध विश्वाला सत्यप्रकाश देणार्‍या या योद्धा संन्याशीला, या आधूनीक अगस्तीला, या दिपस्तंभ विवेकानंदांना माझा कोटी कोटी प्रणाम.वंदे मातरम…(रविवार ४ मार्च २०१२ रोजी, मालाड (प) येथे वक्तृत्व स्पर्धेत दिलेलं वरील भाषण)वक्ता: जयेश शत्रुघ्न मेस्त्रीसंपर्क: smartboy.mestry5@gmail.com

— जयेश मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..