” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे सर्व वाचक लेखक आणि संबंधिताना ही दिवाळी व आगामी वर्ष आनंद सुख समाधानात जावो ही नम्र प्रार्थना.
माझा ब्लॉग ” जीवनाच्या रगाड्यातून” सुरु करून थोडेच दिवस झाले. दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ह्यांचा आधार घेत माझे लिखाण असते. आजपावतो जवळ जवळ २९,९१८ वाचकांनी त्याचा आनंद घेतल्याचे दिसते. वाचक वर्ग हीच लेखकाची खरी शक्ती असते. सर्वाना त्याबद्दल धन्यवाद देतो.
वाचकांची काव्यातील रुची आणि मजकडे असलेला माझ्याच कवितांचा संग्रह ह्याला अनुसरुन फक्त कवितेसाठी ” बागेतील तारका ” हा ब्लॉग नुकताच सादर केला आहे. आधुनिक संगणक तंत्रज्ञानाने ब्लॉग हे दालन उघडले. जो जे लिहू इच्छितो विचार व्यक्त करू इच्छितो त्यांच्यासाठी हे एक व्यासपीठ मिळालेले आहे. व्यासपीठ ही कलाकाराची, लेखकाची प्राथमिक गरज असते. पूर्वी प्रमाणे निर्माता संपादक प्रकाशक इत्यादींच्या छाननी मधून त्याला बाहेर पडण्याची आता गरज नाही. सर्व स्वत:च्या जबाबदारी वरच करा.
ब्लॉग ह्या माध्यमाने वेगळीच क्रांती केलेली आहे. लेखक आणि वाचक ह्यांचा त्वरित आणि प्रत्यक्ष संबंध होऊ शकतो. तुमचे विचार, लेखन वाचक स्वीकारतात किंव्हा अव्हेरतात हे तुम्हाला लगेच कळून येते. येथे ना मध्यस्थी, ना प्रकाशक, ना संपादक, ना काह्नी आर्थिक बोजा. येथे हवे असते तुमचे” बागेतील तारका ” विचार, आवड, श्रम, आणि लेखन. ह्यात वेळेचा सदउपयोग केल्याचे तुम्हास मिळेल समाधान. गाणाऱ्या कलाकाराला जसे दूरदर्शनवर सा रे ग म प द . . अथवा Indion Idiol मूळे व्यासपीठ मिळाले तसेच Blog हे लेखकासाठी आहे. जीवन ही एक निसर्गाच देण आहे. ते चक्रमय असते.प्रत्येक क्षण वा दिवस हा वेगळच प्रसंग घेऊन येत असतो. घटनेचा गुंता करणे आणि त्याची कल्पनात्मक उकालन करणे, निसर्ग करीत असतो. बस हेच प्रसंग, ह्याच कथा असतात. तुम्ही सतर्क असाल तर बरेच विषय तुम्हास लेखनासाठी मिळू शकतात. मग ते ललित लेखन असो वा कविता.
बोल सारे अनुभवाचे त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला अर्थ सांगतो कुणी तरी
अथवा
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे निसर्ग शिकवी क्षणोक्षणी
सतर्कतेने वेचून घ्यावे दैनंदिनीच्या घटनामधुनी
” जीवनाच्या रगाड्यातून ” आणि ” बागेतील तारका ” ह्या दोन मराठी ब्लॉगमार्फत तुम्हास दिवाळीची भेट देऊ इच्छितो
** सतर्कतेने जीवनातील मार्मिक प्रसंग टीपणी आणि कविता तुमच्यासाठी असेल हा फराळ.
** वाचताना होणारा आवडल्यास आनंद, अथवा न आवडल्यास संताप, हेच असतील फटाके.
** लेखनावरील सुद्ज्ञ वाचकांच्या प्रतिक्रीया, सल्ले,व मार्गदर्शन असेल दिव्याचा प्रकाश
धन्यवाद. पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply