नवीन लेखन...

दिवाळी अंक आणि मी – प्रवास बारा वर्षांचा

दिवाळी अंकासाठी मी गेली 12 वर्षे सतत लिखाण करतोय पण मोजकच. 2002 सालच्या माझं कोकण दिवाळी अंकात माझी ‘माऊली’ ही तिसरी कथा प्रकाशित झाली. त्यापुर्वी नवाकाळ मध्ये माझ्या दोन कथा प्रकाशित झाल्या होत्या. माझ कोकण दिवाळी अंकासाठी आई या विषयावर साहित्य मागविण्यात आले होते त्यामुळे आईला केंद्रस्थानी ठेवून मी ही प्रेम कथा लिह्ली होती. त्यानंतर 2003 साली सत्यवान तेटांबे ( माझी व्यक्तीगत ओळ्ख असणारे ते साहित्य क्षेत्रातले पहिले आदर्श व्यक्तीमत्व ) त्यांच्या चौफेर साक्षीदार या दिवाळी अंकात माझा ‘हाता तोंडावर आलेल्या निवडणूका आणि मतदारांचे कर्तव्य’ हा लेख प्रकाशित झाला. त्याच दिवाळी अंकात 2004 साली ‘एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे-तोटे’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्याच वर्षी वृत्तबिनधास्त या दिवाळी अंकात ‘प्रेम एक प्रश्न’ हा प्रेम या विषयावरील लेख प्रकाशित झाला होता. त्याच वर्षीच्या शब्दफुलोरा दिवाळी अंकात माझी ‘मृगजळ’ ही प्रेमकथा प्रकाशित झालेली होती. हया कथेचा जन्म बसमधील प्रवासादरम्यान झालेला होता. 2005 सालच्या वृत्तबिनधास्त दिवाळी अंकात माझी पहिली कविता ‘हुंडाबळी’ आणि त्याच वर्षीच्या विशेषमाला वार्ता दिवाळी अंकात माझी सर्वात आवडती कविता ‘फॅशन’ ही प्रकाशित झाली होती. 2006 च्या पुरूषस्पंदन दिवाळी अंकात माझी ‘लेखणी’ ही पुरूषप्रधान कथा प्रकाशित झाली होती. त्यानंतर 2007 साली दरवळ दिवाळी अंकात माझी ‘कवितेचा कवी’ ही कथा प्रकाशित झाली जी एका सामान्य माणूस प्रेमात पडल्यावर का कवी होतो यावर आधारीत होती. त्यानंतर पुन्हा 2008 साली चौफेर साक्षीदार दिवाळी अंकात माझा ‘घटनेच्या आधारेच मुंबईला वाचवा’ हा लेख प्रकाशित झाला. त्याच वर्षीच्या स्वराज्यदीप दिवाळी अंकात माझी ‘रूक्मिणीच्या शोधात’ ही प्रेमकविता प्रकाशित झाली. दीपोत्सव 2008 सिध्दी फ्रेंड्स पब्लिकेशनच्या दिवाळी अंकात माझा ‘स्त्री-शक्ती हा लेख प्रकाशित झाला आणि त्याच वर्षीच्या कलामंच दिवाळी अंकात माझी ‘धक्का’ ही प्रेमकथा प्रकाशित झाली. 2009 दिपोत्सव दिवाळी अंकात पुन्हा माझी ‘गांव’ ही कविता प्रकाशित झाली. त्याच वर्षीच्या अंतःस्फूर्ती दिवाळी अंकात भावना शून्य माणूस, कथा प्रकाशित. 2010 साली ॐ दिप ज्योती दिवाळी अंकात ‘लेखक’ आणि कलामंच दिवाळी अंकात पाऊस त्याचबरोबर दरवळ दिवाळी अंकात ‘धडपड’ या तीन कथा प्रकाशित झाल्या. त्याच वर्षीच्या दीपोत्सव 2010 सिध्दी फ्रेंड्स पब्लिकेशनच्या दिवाळी अंकात ‘आधुनिकता’ ही कविता प्रकाशित. पुन्हा दीपोत्सव 2011 सिध्दी फ्रेंड्स पब्लिकेशनच्या दिवाळी अंकात ‘कवी’ कविता प्रकाशित, त्याच वर्षी ॐ दिप ज्योती दिवाळी अंकात ‘ लग्न एक प्रश्न की उत्तर’ हा लेख प्रकाशित झाला. श्रावणी दिवाळी अंकात ‘नजर’ आणि कलामंच दिवाळी अंकात ‘लग्न’ हया कथा ही त्याच वर्षी प्रकाशित झाल्या. 2011 साली मी माझे ‘साहित्य उपेक्षितांचे’ हे मासिक सुरू केल्यामुळे त्या वर्षी इतर दिवाळी अंकासाठी लिखाण करण शक्य झाल नाही त्या वर्षीच्या साहित्य उपेक्षितांचेच्या दिवाळी अंकात माझी ‘प्रेम’ ही दिर्घ कथा प्रकाशित झाली होती. 2012 साली ही तेच माझ्या याच दिवाळी अंकात माझ्या ‘सूखी प्राणी’ आणि ‘साक्षात्कार’ या कथा तसेच स्त्री-भ्रूणह्त्या,माझा बाप,सोशल नेटवर्क साईट्स इ. लेख प्रकाशित झाले होते. पण 2013 सालच्या ॐ दिप ज्योती दिवाळी अंकात माझा ‘सराडा’ हा लेख प्रकाशित झालाय त्याचबरोबर सुजाता दिवाळी अंकात ‘झोपडी’ ही कथा प्रकाशित झालेय. मुंबई प्रसिध्द संध्या या दिवाळी विशेषांकात ‘दिवाळी’ कविता प्रकाशित, नवतरंग मासिकाच्या दिवाळी विशेषांकात एका मनस्वी शिक्षकाची मुलाखत प्रकाशित. आमच्या साहित्य उपेक्षितांचे 2013 च्या दीपावली विशेषांकात ‘लबाड पुरूष ही दिर्घ कथा, ‘सूर्य नजरे आड गेला’ हा देवतुल्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील लेख, ‘असुरक्षित स्त्री’ डॉ.दाभोळ्करांच्या विचारांची ह्त्या हे वास्तववादी लेख, रायगडावर एक दिवस हा सहलीवर आधारीत लेख आणि माझ्या बर्‍याच अप्रकाशित कविता या दिवाळी अंकात प्रकाशित केलेल्या आहेत. 2002- 2013 साला पर्यत मराठी दिवाळी अंकासोबत माझा 12 वर्षाचा प्रवास हा असा झालेला आहे या प्रवासा दरम्यानच माझ्यातील कवी,लेखक आणि पत्रकार त्याच बरोबर सामाजिक जाणिव असणारा, जपणारा आणि जाणणारा माणूसही घडला आहे कदाचित…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..