कोजागिरीची पोर्णिमा परि
आकाश होते ढगाळलेले
शोधूं लागले नयन माझे
चंद्र चांदणें कोठे लपले ?
गाणी गाऊन नाचत होती
गच्चीवरली मंडळी सारी
आनंदाची नशा चढून मग
तल्लीन झाली आपल्याच परी
मध्यरात्र ती होऊन गेली
चंद्र न दिसे अजूनी कुणा
वायु नव्हता फिरत नभी तो
मेघ राहती त्याच ठिकाणा
दुध आटवूनी प्रसाद घेण्या
उत्सुक होतो आम्ही सारे
ढगांत लपल्या चंद्राला मग
क्षीरांत शोधती आमची नजरे
स्वादिष्ट मधू दुग्धामृत ते
शशिधराच्या चांदण्यापरी
मेघांमध्यें तो लपला नसूनी
उतरला होता ह्याच क्षीरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***२०
नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला देवकीने नंदाघरी पाठविलं
ईश्वरी अवताराची चाहूल लागूनही मातृ ह्रदय हळहळलं
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply