(दुधी भोपळ्याचे सूप सहजासहजी मुले पिणार नाही पण त्यात टमाटो घातल्यास कोणालाही कळणार नाही हे दुधी भोपळ्याचे सूप आहे. )
आवश्यक साहित्य : दुधी भोपळा २५० ग्रॅम
, टमाटो १०० ग्रॅम (२ किंवा ३), जीरा पावडर १/२ चमचे , काळी मिरी पावडर १/२ चमचे , मीठ १/२ चमचे.
असेल तर: लोणी १ चमचे व कोथिंबीर
कृती : दुधी भोपळा व टमाटो बारीक चिरून घ्यावा. गैस वर कुकर ठेवून, चिरलेला दुधी व टमाटो दोन वाट्या पाणी घालून एक किंवा दोन सीट्या होऊ ध्या. (वेळ ३ मिनिटे)
थंड झाल्यावर कुकर मधून दुधी व टमाटो चे तुकडे काढून मिक्सी मध्ये थंड पाणी घालून वाटून घ्या व मिश्रण एक चाळणी मधून एका भांडया मध्ये गाळून घ्या ( ३ मिनिटे)
भांड गैस वर ठेऊन कुकर मध्ये उरलेलं पाणी, जीरा पावडर, काळी मिरी पावडर व मीठ घालुन . एक उकळी आल्या वर गैस बंद करा. सूप तैयार. ( 2 मिनिटे)
एक चमचा लोणी व कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व करा.मुलाना निश्चित आवडेल.
Leave a Reply