वाळलेली झाड, आणि सुकलेली खोड,
थकलेल्या जीवा न्हाई उन्हाचीबी चाड,
जळलेल्या वाटांना, पावसाची आस,
करपलेली शेत हि पाण्याविन उदास,
रणरण फिरणारी मुकी जनावरे,
डोळ्यातच अटताय, पाणी ते खारे,
पाण्याविन पक्षाचाही, चिवचिवत न्हाई,
दोन थेंब पाण्यासाठी, कोरड्या दिशा दाही,
आता तरी पाण्याविन, मरण स्वस्त झाल,
हंडाभर पाण्यापायी, गुर खाटकान नेल,
आटल्या विहिरी, नदी नालेही आटले,
पाणी पाणी करत, घरदारही सुटले,
तरी न्हाई भागली, तहान जीवाची,
ढगाकड डोळ आणि वाट पावसाची,
आपला,
शैलेश देशपांडे
— शैलेश िवलास देशपांडे उर्फ श…
Leave a Reply