दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।।
येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।।
आज अशी तु उडुनी पाखरा पंख तुझे पसरले काळ चालला त्यास पकडण्या झेपावित चालेपरंतु तुझिया नेत्रा येईल जळ जेव्हा डवरून टाक अश्रू हे झोळी माझ्या जा तर उडून फिरुन
— जयंत वैद्य
Leave a Reply