देव दर्शनास पूर्व परवानगी ?………….
आश्चर्य !!!!! वाटले ना ? ……… पण हें खरें आहे.
माउंट मेडोना सेंटर च्या संकट मोचन हनुमान मंदिरात दर शनिवारच्या दर्शनासाठी घ्यावी लागते.
हा नियम कटाक्षाने पाळला जातो कारण मंदिराची वाहन व्यवस्था मर्यादित असल्या मुळे त्यांना आगाऊ परवानगी देणे प्राप्त आहे. हे संकट मोचन मंदिर अमेरिकेच्या सांटा क्लारा ह्या कौंटी मध्ये घनदाट आश्या जंगलात उंच माउंट मेडोना पर्वता वर वसविले आहे. निसर्ग रम्य वातावरणा मध्ये ध्यानसाधने साठी , रमणीय श्रुष्टी देखावा बघण्या साठी तसेंच हायकिंग, ट्रायकिंग , व काम्पेनिंग साठी हा परिसर योग्य आहे व तशी व्यवस्था पुरविणारे पण उपलब्द्ध आहेत. हे संकट मोचन हनुमान मंदिर श्री योगी बाबा हरिदास ह्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिषांनी सन २००३ मध्ये स्थापना केली. श्री बाबा हरिदास हें १९५२ साला पासून मौन वृतात आहेत. गेले ४० वर्षे तें इथेच राहून योग साधना व मौन योगात राहून आपल्या शिषाना मार्गदर्शन करतात. माउंट मेडोना सेंटर परिसरात क्रिएटीव आर्ट , योग व आरोग्य या विषयाचे आभ्यास क्रम ,प्रशिक्षण केंद्र आहे.
मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळी देवाची आरती मोढ्या प्रमाणात केली जाते. ह्यावेळी जरूर उपस्थित राहावे .
— मा.ना. बासरकर
Leave a Reply