नवीन लेखन...

दोन हजार मंदिरांचं गाव 

“दोन हजार मंदिरांच्या नगरीत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे !”

या वर्षीच्या दिवाळीतील भटकंतीच्या दुसऱ्या चरणाचा प्रारंभ करताना सातारा जिल्ह्यातील वाई या कृष्णेकाठच्या शांत गावात मी कुटुंबियांसह प्रवेश केला आणि माझे मित्र श्री. सचिन घाटगे यांनी आम्हा सर्वांचे तोंड भरून स्वागत केले. मुक्कामाची व भटकंतीची जय्यत तयारी झाली असल्यामुळे आमचा प्रवास सुरु झाला.

खरं तर देव व देवळं ह्यांच्याशी आमचा दुरूनही संबंध येत नाही. पण तब्बल ३३ वर्षांपूर्वी बघितलेली खळाळून वाहणारी कृष्णामाई व तिच्या काठावरच्या हेमाडपंथी बांधणीच्या सुरेख मंदिरांच्या स्मृती जागृत करण्यासाठी अखेर महागणपतीच्या आवारात पाय टाकलाच.

कृष्णेवर धरण बांधल्यामुळे नदीच्या पाण्याचा खळखळाट इतिहासजमा होऊन त्यातील जीव निघून गेला होता. मंदिराचा परिसर सेल्फी काढण्यात दंग झालेल्या ‘सेल्फिश’ भाविकांनी गजबजून गेला होता. त्या वातावरणातून बाहेर पडून आम्ही मेणवलीकडे प्रयाण केले.

नाना फडणविसांच्या वाड्यात शिरण्याआधी दोनशे वर्षाहून जुन्या डौलदार बाओबाब वृक्षाने आमचे स्वागत केले. वाड्याची अवस्था केविलवाणी असली तरी त्याच्या पाठीमागे असलेल्या शेकडो वर्षांपूर्वीच्या घाटांचा व मंदिरांचा एकही दगड आपल्या जागेवरून हललेला नाही. तिथेही कृष्णेच्या पाण्याचं डबकं झालं आहे. पण मंदिरांनी सजलेला तो सुरेख घाट डोळ्याचं पारणं फेडतो.

वाई परिसरात आजपर्यंत तब्बल तीनशे चित्रपटांची शूटिंग्ज झाली आहेत. हा घाटही त्याला अपवाद नाही. धोम धरणाचं दर्शन घेऊन व पसरणी घाटात सह्याद्रीच्या कुशीत पाचगणी रस्त्यावरील अत्यंत निसर्गरम्य परिसरात वसलेल्या सरकारी रेशीम केंद्रात बराच वेळ व्यतीत करून आम्ही वाईत परतलो.

कुटुंबियांसोबत कुठेही गेलो तरी शेतकरी व मिटींग्स काही पाठ सोडत नसल्यामुळे ‘सातारा जिल्ह्यात स्वयंसिध्द शेतकऱ्यांची संख्या कशी वाढवता येईल’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या मीटिंगमध्ये विचारमंथन झाल्यानंतरच दिवस खऱ्या अर्थाने संपला !

श्रीकांत पोहनकर 
98226 98100 
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..