भाऊलीच्या दुधासारखे मृगाचे तुशार बरसायला लागले की पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूर शहराजवळील वडापूरी या गावात नंदीबैलवाल्यांची पालं पडतात. नंदीबैलवाले त्यांना ‘तिरमाडी, तिरमाली` असे ही म्हणतता. ती भटक्या विमुक्तांची एक जमात असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात या जमातीने आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे. आषाढ-श्रावणात नंदीबैलवाल्यांची ‘वडापुरी` येथे पालं पडतात. त्यामागे एक कारण आहे.’वडापुरी` येथे एक नंदी अचानक मरण पावला त्या गावालाच ग्रामदैवत मानून नंदीबैलवाले पावसाळयाच्या दिवसांत तेथे वस्तीला येतात वडापुरी जवळ जमलेले नंदीबैलवाले नवस फेडणे, बळी देणे, लग्न कार्यासारखे विधी तेथे उरकतात. नंदीबैलाचे खेळ करणे, भविष्य सांगणे यावर नंदीबैलवाल्यांची उपजिविका असते. नंदीबैलवाले मुळ आंध्रातले. ‘तिरूमल` हा त्यांचा मुळ देव. सरोदे, शिंदे, पवार, जाधव अशी नंदीबैलवाल्यांची आडनावे असतात. औरंगावबाद जिल्हातिल पैठण जवळी जेवूर हैबती हे नंदीबैलवाल्यांचे मुळ गाव. नंदीबैलवाले सुमारे ८०० वर्शापूर्वी आंध्रातून महाराष्ट्रात आले. १९६९ ते १९७२ या काळात झालेल्या सर्वेक्षणात त्यांची लोकसंख्या २८०० होती. नंदीबैलवाल्यांचा आणि हवामानाच्या अंदाजाचा जवळचा संबध. ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?` हे गाण सर्वपरिचित आहे. भोलानाथ म्हणजेच नंदीचे नाव ‘पाऊस पडेल का?` असे नंदीला विचारले जाते व तो मान हलवून पाऊस पडणार असल्याचा संकेत देतो. केवळ हवामानाचा अंदाज सांगणारा नंदी व या नंदीला सांभाळणारा नंदीबैलवाला ‘लोककला` या वर्गात मोडतील असे खेळ ही करतो. ते असे – मांडीवर नंदीचे चार पाय ठेवून घेणे, नंदीच्या दाढेत आपली मान देणे व ती मान नंदीकडून गर गर फिरवून घेणे, नंदीने नाच करणे असे विविध प्रकार या खेळात केले जातात. नंदीबैलवाले मराठी लोकधर्मात इ
के लोकप्रिय होते की, या परंपरेवर संतांनी भारूडे ही रचली आहेत.
पाटील, चौगुले, कोमटी, दवंडीवाले असे नंदीबैलवाल्यांचे चार विभाग आहेत. नंदीबैलवाले भविष्य कथन करतात. स्त्रिया
पोत, मणी, सुया, सागरगोटे आदी वस्तू विकतात. नंदीबैलवाल्यांची स्वतंत्र बोली असून त्यांचा संचार पूर्ण भारतभर असतो. नंदीबैलवाले हा विषय घेऊन अलीकडेच आनंद कसुंबे या विदर्भातील दूरदशनच्या प्रतिनिधीने एक वृत्तमालिका प्रदर्षित केली होती या वृत्तमालिकेस उत्कृष्ट वृत्तमालिका म्हणून पुरस्कार प्राप्तझाला होता.नंदीचे भारूड असे- <
—
Leave a Reply