नवीन लेखन...

नकाराचा सूर धुमसतोय ……….

अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणारी आजची तरुण पोरं. नकार ऐकण्याची सवय नसलेली. काहीतरी करण्याच्या हेतुने झपाटलेली हे झपाट लेपणं कुठुन येतं? कोण देत यांना ऊर्जेचं रसायन? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना विचारावासा वाटेल? हो ना? पण, या ऊर्जेची दोरी पालकांच्या हातात कुणी बरी दिली? असा जागरुक प्रश्न विचारत आहेत आजची ग्लोबल पोरं.

सतत हे करु नका, असं वागु नका, ते पाहु नका, जर बोललात तर खबरदार ! अशी धमकी वजा सुचना आज प्रत्येक घरा घरातुन ऐकु येते या सुचनांच्या हॉर्नवर ताबा ठेवु पाहणारी आजची मुलं नकाराचा सूर सतत धुमसतोय. तो कधी आईच्या डोळ्यांतुन तर कधी बाबांच्या बोलण्यातुन. आमचं कोणी ऐकेल का? असा प्रश्न माझ्या वयाच्या अनेकांना विचारावासा वाटतोय. पण, बोलुच दिलं जात नाही. ही आगतिकता कुठेतरी खदखदतेय का? संवाद घडत नाही तो घडवुन आणणारा एखादा अवलिया आपल्याच लहानग्यात वावरतोय. त्याच्या निरागस मनात एकदा डोकावुन पहा.

या मुलांना खुप बोलायचय, काहीतरी घडवायचय. वेगळ्या वाटेने चालायचय, त्यांना करु द्या त्यातुन झालं तर काही चांगलच निर्माण होणार आहे. चुका, होऊ देत त्यातुन शिकू देत आजी आजोबांसारखं संपृक्त, समर्थ विद्यापीठ मिळू देत. अवास्तव अपेक्षा पालकांकडुन नेहमीच केल्या जातात. पण अपेक्षांचं ओझं लादताना थोडा आमचाही विचार होऊ द्या.

प्रचंड ऊर्जा आम्हा तरुणांमध्ये आहे. जगाचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आधुनिक बदल घडवण्याची क्षमता आमच्यात आहे. त्यालाही प्रोत्साहन मिळू देताना आपला नकार आमच्या होकार आमच्या मार्गातला काटा होऊ देऊ नका. आपला होकार मैताचा दगड ठरु द्यात.

जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे, आणि प्रसारामुळे परिवर्तनाची नवी लाट येऊ घातली आहे. तिला समोर जाण्याचं आव्हान आम्ही स्विकारलं आहे. पारतंत्र्याचा दबदबा निर्माण होण्याऐवजी स्वातंत्र्याची कवाडं खुली केलीत तर अधिक पंख झेपावुन उडण्याचं सामर्थ्य आम्हाला मिळेल. माध्यमाचं अतिक्रमण होत आहे असं आम्ही मुळीच मानत नाही. माध्यमांमुळे अख्ख जग चक्क दारात उभं ठाकलं आहे. पण, गरज आहे ती आता मानसिकता बदलण्याची.

पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात ही सनातन वैचारिकता आता बदलू लागली आहे. तर अनुभव घेऊन समृद्ध होऊ पाहणारी तरुण पोरं निर्माण होत आहेत याचाच अभिमान बाळगण्याचहे आता गरज आहे. “जुने जाऊ द्या मरणाला गुनी…..” असं म्हणणारी पोरं पुस्तकाच्या न् जगाच्या नकाशावर चमकण्याचा हा काळ आहे असं मला वाटतं. म्हणुनच धुमसणारा नकाराचा सुर चांगल्या आचार, विचार, आणि संवादाच्या माध्यमातुन शांत होण्याची आवशक्यता आहे. एकदा संधी तर देऊन पहा…….. परिवर्तन नक्कीच घडेल…..

— प्रकाश बोरडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..