नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णाने त्याच्या ताब्यातील १६००० अबलांची सुटका केली,व समाजात त्यांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन केले.ही घटना म्हणजे “सामाजिक क्रांती” म्हणावी लागेल. अशा या जुलुमाने पळवून नेलेल्या स्त्रियांना समाजात परत वसवून श्रीकृष्णाने त्यांचे राजा या नात्याने पालकत्व स्वीकारले.
“राष्ट्रपती,सेनापती, सभापती ” या अर्थाने ते त्या अबलांचे पती होते. कांही अज्ञानी,अर्धवट अभ्यास केलेले विद्वान (?) श्रीकृष्णाने १६००० स्त्रियांशी लग्न केले असा अपप्रचार करून त्यांचे चारित्र्य-हनन करतात ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. असे महाभाग आपल्या संतांच्या बाबतीत पण (विशेषतः रामदासस्वामी) अशीच गरळ ओकत असतात,हे अतिशय समाजविघातक कृत्य आहे.समाजातातील सुद्न्य, समंजस, विवेकी जन अशा अपप्रचाराला भिक घालत नाहीत.
दीपावलीतील नरकचतुर्दशीचा दिवस श्रीकृष्णाने असुर शक्तीवर/प्रवृत्तीवर मिळवलेला ऐतिहासिक विजय म्हणून साजरा करतात.
(सौजन्य आकाशवाणी पुणे.चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाचा सारांश )
Leave a Reply