१६ जानेवारी २००१ रोजी नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या कोठेवाडी गावात १५ जणांच्या टोळीने दरोडा टाकून मुली, मध्यमवयीन व वृद्ध महिलांवर सामुहिक अत्याचार केल्याची जी घटना घडली, त्या घटनेने माणुसकीचे खरोचखरेच धिंडवडे निघाले. अत्यंत नीच असे कृत्य करणार्या गुन्हेगारांना जिल्हा न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेप आणि सक्तमजुरीची शिक्षा
उच्च न्यायायलातही कायम ठेवण्यात आलेली शिक्षा ही घटना न्यायदेवतेवरचा विश्वास आणखी दृढ करणारी आहे. वास्तविक पहाता या घटनेतील नराधमांना खरे तर फाशीचीच शिक्षा हवी, अशी भावना अत्याचारित महिलांमधून व्यक्त होत आहे. गुन्हेगारी इतिहासातील ही सर्वात क्रूर अशी घटना आहे. या गुन्ह्यातील आरोपींचे नातेवाईक सूड घेतील, अशी भिती कोठेवाडी येथे व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. कोठेवाडी येथे पोलिस चौकी मंजूर केल्याचे विधानसभेत सांगून पाच वर्षे झाली. मात्र निर्णय नाही. या घटनेत चोरी गेलेले अत्याचारित महिलांचे सोन्याचे दागिणे पोलिसांनी अद्यापपर्यंत दिले नाहीत. जिल्हा न्यायालयाच्या निकालानंतर कोठेवाडी गावात अनोळखी लोकांचा वावर वाढल्याचे अत्याचारित महिलांनी कळवूनदेखील राज्याचे पोलिस दखल घेणार नसतील तर पोलिसांना आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना अशी घटना पुन्हा घडावी, अशी प्रतिक्षा आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचनू राहत नाही. बाळासाहेब शेटे
— बाळासाहेब शेटे
Leave a Reply