नवीन लेखन...

नाचता नाचता व्यायाम

एरोबिक्स, बॉलीवूड डान्स आणि झुंबा..सध्या हे व्यायामप्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. मुळात होऊन जाणार ही संकल्पनाच आकर्षक आणि मजेशीर वाटावी अशी आहे. एरोबिक्स सत्तरच्या दशकातच परदेशात एरोबिक्स लोकप्रिय होऊ लागले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या व्यायामाच्या गरजेनुसार इतर प्रकार शोधून काढायला सुरुवात केली. झुंबा असो की बॉलीवूड डान्स. सगळ्याचा पाया एरोबिक्स हाच! एरोबिक्स म्हटलं की म्हणजे तालबद्ध कवायत डोळ्यासमोर येते. पण उगीचंच कशाही उडय़ा मारणे किंवा इकडे-तिकडे वळून व्यायाम करणे म्हणजे एरोबिक्स नव्हे. एरोबिक्समध्ये ‘फ्लोअर एरोबिक्स’ व ‘बेंच एरोबिक्स’ असे दोन प्रकार आहेत. फ्लोअर एरोबिक्समध्ये सुरुवातीला ‘वॉर्म अप’ व्यायाम करावे लागतात. यातही नुसते कसेही हात-पाय हलवून चालत नाही. वॉर्म अपच्याही ठरलेल्या स्टेप्स असतात. त्यालाच जोडून ३० ते ४० मिनिटे पोटावरील स्नायूंना (अॅअब्ज) तसेच कमरेखालच्या व वरच्या शरीराला व्यायाम दिला जातो.

एरोबिक्स मध्ये वॉर्म अप असतोच. पण प्रत्यक्ष व्यायाम ‘बेंच’वर म्हणजे ठरावीक उंचीच्या मोडय़ांवर साधारण ३० मिनिटांसाठी असतो. कमरेखालचे आणि वरचे शरीर व हृदय यांच्यासाठी हा चांगला व्यायाम आहे. यात बेंचच्या स्टेप्स चढणे व उतरण्यात पायांचाही खूप वापर होतो. झुंबा आणि बॉलीवूड डान्स झुंबा या प्रकारात एकामागोमाग एक गाणी लावून त्यावर ठरावीक पद्धतीने बसवलेल्या नृत्यासारख्या स्टेप्स केल्या जातात. यातली संगीत व गाणी ठरलेली असतात. संगीत हेच झुंबाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. संगीताच्या तालावर पाय आपसूक थिरकायला लागतात आणि नाचायचा हुरूप येतो. ७-८ वर्षांपूर्वीपासून झुंबा आपल्याकडे आला आणि हळूहळू लोकप्रियही होऊ लागला. बॉलीवूड डान्समध्येही वॉर्म अप चुकत नाही. पुढची ३० ते ४० मिनिटे व्यायाम करायचा असल्याने तो गरजेचा असतो. एरोबिक्स, झुंबा आणि बॉलीवूड डान्स या तिन्ही व्यायामांमध्ये नाचताना इतर कोणताही विचार मनात येत नाही. कारण इतर विचार करताना नाचाच्या स्टेप्स हटकून चुकतात, त्यामुळे व्यायामाकडे लक्ष द्यावेच लागते. या सर्व व्यायामप्रकारांमध्ये शेवटी ‘कूल डाऊन’ व्यायाम तसेच स्नायूंचे व शरीराला चांगल्या प्रकारे ताण देण्याचे (स्ट्रेचिंग) व्यायाम केले जातात. असा हा ५५ मिनिटे ते १ तासाचा ‘वर्कआऊट’ असतो. या व्यायाम प्रकारांना जिमच्या भाषेत ‘कार्डिओ-रेस्पिरेटरी वर्कआऊट’ असे संबोधले जाते.

त्यामुळे शरीराला होणारे फायदे असे. * हालचाली करताना शरीराला चांगला रक्तपुरवठा व्हावा लागत असल्यामुळे अर्थातच हृदयाचे काम वाढते. प्राणवायू अधिक घ्यावा लागतो त्यामुळे श्वासोश्वासही वाढतो. ३ ते ४ महिने सातत्याने हे व्यायाम केल्यानंतर शरीराचा ‘स्टॅमिना’ वाढल्याचे जाणवू लागते. * नाचात पाय आणि हाताच्या हालचाली खूप असतात. पुन:पुन्हा झालेल्या एकाच प्रकारच्या हालचालींमुळे स्नायूंना उत्तम व्यायाम होतो आणि स्नायू पिळदार होतात. (स्नायूंचे टोनिंग) * नाचताना घाम खूप येतो आणि शरीरातील नको असलेली द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. * शरीरात स्त्रवणाऱ्या संप्रेरकांची यंत्रणा, चयापचय क्रिया सुधारते, चांगली भूक लागू लागते. * इतर कोणताही विचार न करता तासभर पूर्ण लक्ष देऊन नाचाचा व्यायाम करताना अक्षरश: प्राणायाम केल्यावर जसा शांत अनुभव मिळतो तसाच अनुभव येतो. हलके, ताजेतवाने वाटू लागते. * उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य सल्ला घेऊन हे व्यायाम करता येतात. या आजारांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम व्यायामांनी काही प्रमाणात कमी करता येतात. * एरोबिक्स व नाचाच्या व्यायामात सांध्यांनाही चांगला व्यायाम होतो. भविष्यात संधिवात, हाडे ठिसूळ होणे या गोष्टी टाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. * चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजन कमी व्हायला याची मदत होते. पण अर्थात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीच्या आहाराचाही मोठा भाग असतो. कमी झालेले वजन कमी राखण्यासाठी हे व्यायाम व जोडीने ‘वेट ट्रेनिंग’सारखे इतर व्यायामही सुचवले जातात. व्यक्तीला मुळात ज्या कारणासाठी व्यायाम करायचा आहे ते लक्षात घेऊन नाचाबरोबर इतर प्रकारच्या व्यायामांचा योग्य मेळ घालता येतो.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- लोकसत्ता / डॉ. पलक कुलकर्णी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..