नवीन लेखन...

नाडी ज्योतिष

(विधीलिखीत बाबी टाळता येत नसतात. त्यामुळे पोथी वाचून, खडे वापरुन, विधी करुन विषेश लाभ होत नाही. त्याच्यात त्या व्यक्तीचे पैसे वेळ आणि श्रम वाया जातात आणि त्याचा विश्वास उडतो. मात्र मुद्दाम सांगतो की भविष्य जरुर जाणून घ्यावे आणि त्या नुसार मनाची धारणा थोडी बदलावी आणि प्रयत्न चालूच ठेवावेच. कर्मकांडत अडकू नये. असे केले तर फसवणूकीचा प्रश्नच उद्भवत नाही.)
माणसावर ज्यावेळी एका मागून एक अकल्पित संकटे येतात त्यावेळी माणूस बुवा आणि ज्योतिषांचा आधार घेतो. मला स्वतःला अशा संकटातून जाताना शेवटी या शास्त्राचा आधार घ्यावा लागला.
माणूस म्हटला की त्याला शारिरीक मानसिक बौध्दिक व दैविक समस्यांना सामोरे जावे लागतेच. शारीरिक समस्यांसाठी त्या त्या डॉक्टरांकडे जावे लागते. मानसिक समस्यांसाठी मानसोपचार तज्ञांकडे जावे लागते. मात्र बौध्दिक व दैविक समस्यांसाठी डॉक्टर्स काहीच करु शकत नाहीत. त्यामुळेच बुवा किंवा ज्योतिषाचा आधार घ्यावा लागतो. मात्र हे बुवा आणि ज्योतिषी त्या योग्यतेच असावे लागतात. अन्यथा फसगत होते आणि त्यातून बुध्दी, श्रम, पैसा आणि वेळ वाया जातो. आगीतून फुफाट्यात पडल्यागत माणसाची अवस्था होते.
डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डॉ. श्रीराम लागू आदींनी कितीही आरडा ओरडा केला तरीही माणसावर तशी वेळ आली की त्याने आत्महत्या करण्यापेक्षा आणि कुटूंबातील अन्य मंडळींना मारुन सर्व संपवण्यापेक्षा व्यावहारिक उत्तर सापडत नसल्यास ज्योतिष शास्त्राचा जरुर आधार घ्यावा असे मी स्वानुभवावरुन सांगू इच्छितो.
ज्योतिष शास्त्रामध्ये हस्तरेषा, अंकज्योतिष, कुंडली शास्त्र आणि नाडी ज्योतिष असे मुख्य चार प्रकार आहेत. फेस रिडींग, तीळ व अंगलक्षणे यावरुन पण काही जण ज्योतिष सांगतात मात्र हस्तरेषा, अंक ज्योतिष, कुंडली आणि नाडी हे चार प्रकार प्रसिध्द आहेत. पुर्वीच्या ऋषीमुनींनी संशोधन करुन ती शास्त्रे लिहुन ठेवली आहेत. ‘बुडत्याला काडीचा आधार या उक्ती प्रमाणे ज्यावेळी सगळीकडून माणूस संकटात घेरला जातो. त्यावेळी त्याने या शास्त्रांचा मार्गदर्शक म्हणून जरुर वापर करावा.
हस्तरेषा फारच उपयुक्त शास्त्र असून हातावरील रेषा आणि उंचवटे आणि लक्षणे या आधारे काहीजण अचूक भाष्य करतात. देहुगाव येथे श्री.द.वा.अत्रे म्हणून ज्योतिषी आहेत. त्यांचा याबाबत गाढा अभ्यास आहे. त्यांच्याकडे मोठे मोठे पुढारी आणि सामान्य माणसे समस्या घेऊन जातात आणि त्यांना चांगले अनुभव येतात.
मी स्वतः २-४ समस्यांसाठी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी सांगितलेल्या तारखांना त्या समस्यांचे निराकरण झाले. असे अनेक हस्तरेषा तज्ञ बाजारात आहेत. मात्र त्यांना एखाद्या दैवी शक्तीची देणगी लाभल्या शिवाय त्यांची भविष्य खरी ठरत नाहीत. श्री. अत्रे यांना वाचा सिध्दी असल्यामुळे आणि हस्तरेषांचे ज्ञान असल्यामुळे त्यांची भाकिते खरी ठरली आहेत. मी स्वतः आणि काही जणांमार्फत ऐकलेले आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी या शास्त्राचा जरुर लाभ घ्यावा. श्री.अत्रे यांनी आपना हाथ जगन्नाथ या नावाचे एक पुस्तकपण लिहले आहे.
मी स्वतः हस्तरेषा अंकज्योतिष आणि कुंडली या तिन्हीही शास्त्रांची पुस्तके वाचून अभ्यास केला आहे. अंक ज्योतिष हे पण हे एक शास्त्र आहे. त्यासाठी जन्मतारीख माहीत असावी लागते आणि भाग्यांक नासीक अंक आणि प्रारब्ध अंक मांडून त्यानुसार भाकिते सांगितली जातात.
बिबवेवाडी येथे श्री.म्हाळंक म्हणून या शास्त्राचे जाणकार आहेत. कुंडली शास्त्र हे तर एक प्रचलित शास्त्र आहे. जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण माहित असल्यास त्या आधारे पत्रिका मांडून रास आणि कुठल्या स्थानात कुठला ग्रह आहे आणि कोणती महादशा चालू आहे. त्यावरुन भाकिते वर्तविली जातात आणि आपला प्रारब्ध वर्तविला जातो. त्यामुळे हे एक उपयुक्त शास्त्र आहे.
नाडी ज्योतिष हे तर फारच अफलातून निर्माण झालेले शास्त्र आहे. चिंचवड येथे डांगेचौक गणेशनगर येथे एक केंद्र असून कोथरुड नगर रोड आदी मिळून तीन केंद्रे पुण्यात आहेत. आपण हाताच्या आंगठ्यांचा ठसा दिला की त्यावरुन पट्यांचा शोध घेतला जातो आणि पट्या उपलब्ध असल्यास ते आईचे किंवा वडीलांचे व बायकोचे किंवा भविष्य बघणार्‍यांचे नाव सांगतात व अन्य माहिती सांगतात आणि ती खरी असली तरच आपण हो म्हणायचे म्हणजे ते आपली पट्टी म्हणून बाजुला काढली जाते. या पट्यांवर तामिळी मोडी मध्यें अक्षरे लिहलेली असतात. त्यामुळे नाडी रिडर ती अक्षरे वाचतो आणि दुभाषा त्याचे तमिळ मधून हिंदी इंग्रजी किंवा मराठीत भाषांतर करुन देतो.
त्याची टेप किंवा सिडी त्या व्यक्तीला दिली जाते. त्या पट्टीत, आई, वडील, बायको किंवा आपले नाव तंतोतंत कशी काय लिहली आहेत. आपले शिक्षण आपला व्यवसाय मुले-बाळे तस्सम माहिती त्यात कशी काय नमुद केलेली आहे हे पाहुन आश्चर्यचकित व्हायला होते. या शास्त्राचा पण मी आधार घेतला. जनरल रिडींगसाठी पट्टी सापडल्यावर सध्या पाचशे रुपये फी घेतली जाते.
मागचा जन्म, हा जन्म आणि पुढचा जन्म आणि मृत्यूची तारीख याची माहिती डिटेल मध्ये माहिती हवी असल्यास पाच हजार रुपये फी घेतली जाते. पण जी माहिती मिळते ती थक्क कणारीच असते. माझ्या बाबतीत २००४ मध्ये त्यांनी केलेली भाकिते ७० ते ८० टक्के खरी ठरली आहेत. त्यामुळे तशी अडचण असल्यास या शास्त्राचा पण आधार घ्यावा. ते सर्व पट्टी सापडण्यावर अवलंबून आहे. भोग भोगायचे शिल्लक असल्यास ते भोगून संपायला आल्याशिवाय पट्टी सापडत नाही.
पट्टीचा शोध लावण्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागतो. ती सापडत नाही तोपर्यंत अन्य शास्त्राचा आधार नक्की घ्यावा.
पट्टीमध्ये वरील माहिती कोणी लिहून ठेवली आहे याबाबत केंद्रात विचारल्यानंतर मजेशीर माहिती कळली ती अशी आहे. भगवान शंकराला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्या आधारे ते पार्वतीचे मागचे जन्म सांगू लागले. त्यावेळी पार्वती थक्क होऊन शंकरांना म्हणाली की तुम्हाला जर एवढे कळते तर जगातील इतरांच्या बाबतीत पण सांगा.
(प्रारब्ध भोगण्यासाठीच आपला जन्म असतो. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मात्र कमकुवत मनाचे लोक त्यावर उपाय विचारतात. तेथेच त्यांची फसवणूक व्हायला सुरवात होते.)
त्यामुळे शंकराने मानससरोवरापाशी पार्वतीस सर्व सांगितले. ती माहिती मत्स्यावताराने ऐकली. त्यांच्याकडून ती ऋषी मुनींनी ऐकली त्यामुळे जवळ जवळ बारा नाड्या तयार झाल्या त्यापैकी कौशीक अगस्ती हा एक प्रकार असून त्याचे मुख्य केंद्र चेन्नई येथे आहे. त्या ठिकाणी भुर्ज पत्रावर ऋषींनी जे लिहून ठेवले असून त्याचे जतन केले आहे. नाडी वाचायची कशी याचे शिक्षण तिथे दिले जाते आणि अनेक शहरात संस्थेने नाडी वाचन केंद्रे उघडली आहेत. भारतात अशी हजारो केंद्रे आहेत. त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक जातात. परदेशी लोक पण भविष्य बघून थक्क होतात. त्यामुळे वाचकांनी या शास्त्राचा लाभ घ्यायला हरकत नाही. मात्र त्यासाठी श्रध्दा विश्वास सबूरी हवी कारण त्यांची परिक्षा घेण्यासाठी जाण्यात काय अर्थ आहे?
तथापि डॉ. दाभोळकर आणि डॉ. श्रीराम लागू यांनी स्वतःच्या अंगठ्याचे ठसे देऊन तेथून माहिती बरोबर निघते की नाही याची शहानिशा करायला काहीच हरकत नाही. पुनर्जन्म वगैरे थोतांड नाही हे पण त्यातून सिध्द होईल त्यामुळे अशा जेष्ठ व्यक्तींनी स्वतः जाऊन माहिती घ्यावी आणि अशा शास्त्राबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत असे मी त्यांना आवाहन करु इच्छितो.
आता फसवणूक कोठे होते ते सांगतो आणि थांबतो, हस्तरेषा, अंकज्योतिष कुंडली आणि नाडी हे आपला प्रारब्ध सांगते. प्रारब्ध भोगण्यासाठीच आपला जन्म असतो. भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मात्र कमकुवत मनाचे लोक त्यावर उपाय विचारतात. तेथेच त्यांची फसवणूक व्हायला सुरवात होते.
विधीलिखीत बाबी टाळता येत नसतात. त्यामुळे पोथी वाचून, खडे वापरुन, विधी करुन विषेश लाभ होत नाही. त्याच्यात त्या व्यक्तीचे पैसे वेळ आणि श्रम वाया जातात आणि त्याचा विश्वास उडतो. मात्र मुद्दाम सांगतो की भविष्य जरुर जाणून घ्यावे आणि त्या नुसार मनाची धारणा थोडी बदलावी आणि प्रयत्न चालूच ठेवावेत. कर्मकांडत अडकू नये. असे केले तर फसवणूकीचा प्रश्नंच उद्भवत नाही.
मात्र चालू काळात एक तर लोक या शास्त्रावर विश्वास ठेवत नाहीत आणि ठेवला तर कर्मकांडात अडकून नशीब बदलण्यासाठी प्रयत्न करतात नंतर ओरडत बसतात. त्यामुळे दूसरा भाग टाळल्यास आपल्याला ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याची कारणे समजून घ्यावी त्यानुसार थोडा वेळ काढल्यास नंतर सर्वकाही ठीक होईल मात्र थांबायची तयारी ठेवायला हवी आणि प्रयत्न जारी ठेवायला हवेत. हेच या शास्त्रातील गमक आहे.
डॉ. व्ही.जी सावंत – पिंपरी
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— डॉ. व्ही.जी. सावंत – पिंपरी

3 Comments on नाडी ज्योतिष

  1. Sir mahiti chaan ahe sarv
    Pn tya lokanche contact No. Dya
    Mhanje amhala tith jata Yeil khup help hoil amhala
    Balumama Chya Navan Changbhal

  2. Dear Sir/Ma’am
    I want to know the address and other details like fees, appointment etc
    Pl send details.

    JK Nimbekar
    Bhabdara

  3. खूप छान माहिती दिली आहे, मनःपूर्वक धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..