नवीन लेखन...

नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

ब देशाचा राजा:- तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात.

अ देशाचा राजा:- आपले कारीगर , आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू.
कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले, ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनी नाणे बनविण्याचे आदेश दिले.

कारीगराने नाणे बनविले, ब देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने अ देशाचेच नाणे बनविले होते. आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात.

ज्याला कळला कथेचा अर्थ
तोच असेल खरा अर्थतज्ञ.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

1 Comment on नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा

  1. vivek ji,
    तुमच्या सर्व लेख-कविता मी वाचतो ( मात्र प्रत्येक वेळी कमेंट लिहायला जमतेंच असें नाहीं.
    मात्र, सगळेंच छान असतें, मनाला व बुद्धीला भिडते.
    खासकरून, पर्यावरणावरील लेख-कविता फारच उत्कृष्ट. त्या वाचून कांहीं लोकांच्या तरी मनात पर्यावरणांसंबंधी जागृती नक्कीच होईल, यात शंका नाहीं .
    सुभाष नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..