पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले. दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले, ‘मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलेस…
आता मीही बघ कशी मैत्री निभावतो ते…. आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही .. आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो.
आणि खरेच ते पाणी दुधात एकरुप झाल्यामुळे दुधाच्याच मोलाने विकले. नंतर ते पाणीमिश्रीत दुध उकळण्यासाठी शेगडीवर ठेवले जाते.तेव्हा पाणी म्हणते, मित्रा तू माझे मोल वाढवून मैत्री निभावलीस… आता माझी पाळी आहे..
आता मी तुझ्या अगोदर जळणार असे म्हणून पाणी दुधापासून अलग होऊन उडायला लागते. आपला मित्र आपल्यापासून दुरावतोय हे लक्षात आल्यावर दुधाला उकळी येते आणि ते उकळते दुध पातेल्यातून खाली आगीवर पडून आग विझवण्याचा प्रयत्न करते. दुध उकळू लागताच दुध तापवणारी व्यक्ती त्या दुधात थोडे पाणी शिंपडते… …तेव्हा कुठे ते उकळते दुध शांत होते .!
नात्यांचेही असेच असते ..
नाती दुध आणि पाण्यासारखीच असतात. एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत. पण दुधात लिंबाचे चार जरी थेंब टाकले तर मात्र दुध आणि पाणी एका क्षणात अलग होतात.
नात्यांचेही तसेच असते, थोडासा जरी अविश्वास झाला तर नाती क्षणार्धात तुटून जातात. म्हणून आपल्या माणसांचा विश्वास कधीच तोडू नका.
कारण,
नात्यांचा ताज़महाल,
विश्वासावर उभा असतो ।
संशयाचा छोटासा घावही त्याला
जमीनदोस्त करुन टाकतो ॥
Leave a Reply