‘’जवळपास वर्षभर हा माझ्या मागे लागलाय, नचूकता मी यायच्या वेळेवर रोज बस्टॉपवर माझी वाट पाहत उभा असलेला दिसतो. मी बसमध्ये चढले की माझ्या मागून चढातो, मी बस सोडली की तो ही सोडतो, माझ्या गोर्या रंगावर आणि मादक शरिरावर भुळ्लाय आणि काय ? मी चुकून त्याच्या नजरेला नजर दिली तर मुलींसारखी नजर चोरतो. बसमध्ये माझ्या बाजुला येऊन उभा राहिला तर मला त्याचा धक्का लागून मी त्याला काही बोलणार नाही याची पूर्ण काळ्जी घेतो. बसमध्ये कोण भेटला तर बोलताना मला प्रभावित कराण्यासाठी लाखाच्या वार्ता करतो. कोणी तरी मोठा विद्वान व्यक्ती असल्याचा आव आणतो. एखाद्या चॉकलेट हिरो सारखा दिसणारा, जीन्स, टी-शर्ट परिधान कराणारा, खांद्यापर्यंत केस वाढविलेला, चेर्यावर पावडर थापणारा, दाढी मिश्या न ठेवणारा, सडापातल बांधा असणारा आणि बोलताना अरे! तूरे ! करणारा विद्वान कसा असू शकतो ? मुर्ख कुठ्ला ! त्याला वाटतय मी त्याच्या प्रेमात पडलेय ! त्याच्या सारखे ह्जार जण माझ्या मागे लागलेत ! मी त्यांना भिक नाही घातली तर हा किस खेत की मुळी आहे ? एक नंबर डरपोक आहे. तस नसत तर हिंमत करून मला काय ते एकदाच विचारून मोकळा झाला असता. रोज बसस्टॉपवर अस तासनतास माझी वाट पाह्त उभा राहिला नसता. बघ ! आता माझ्यापासून किती दूर उभा राहून माझ्याकडे एक टक पाहतोय वेड्यासारखा ! अशा भ्याड मुलाच्या मी प्रेमात पडणार शक्य तरी आहे का ? मला जर कोणी याच्या समोर छेडल तर हा मान खाली घालून चुपचाप निघून जाईल. मला कळत नाही माझ्यापेक्षाही सुंदर दिसणार्या मुली स्वतःहून त्याला चिपकण्याचा प्रयत्न का करतात ? त्या बघ ! त्या दोघी कश्या त्याच्या जवळ उभ्या रहिल्यात एक उजविकडे आणि एक डाविकडे बाजूला जागा नाही म्हणून दुसर्या त्या दोघी एक पुढे आणि एक मागे उभी राहिलेय ! आता बघ ! मी बसमध्ये चढल्याखेरीज हा बसमध्ये चढणार नाही आणि तो चढल्याखेरीज त्या चौघी चढणार नाहीत, पाहिलस आज तू माझ्या सोबत आहेस म्हणून रिक्षाने गेला आणि बरोबर त्या दोघींनाही घेऊन गेला. मला नाही कधी म्हणाला रिक्षाने येतेस का ? चल ! कविता आता आपण पण रिक्षाने जाऊया !’’ कविताने रिक्षाला हात दाखाविला रिक्षा थांबताच दोघीही रिक्षात बसताच कविता म्ह्णाली,’’प्रतिभा तू मगापासून ज्याच्याबद्दल बोलत होतीस त्याच नाव तरी तुला माहीत आहे का ? तू ओळ्खतेस त्याला ? त्यावर प्रतिभा किंचित नाराजीच्या स्वरात म्हणाली,’’ नाही ना ? मला त्याच नावही माहीत नाही आणि मी त्याला ओळखतही नाही ! प्रतिभा तू त्याला ओळखत नसताना त्याच्याबद्दलच तुझ मत कस काय बनवू शकतेस ? मला खात्री आहे उद्या तू जर त्याच्या समोर तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडलास तर तो नाही म्हणेल ! त्यावर प्रतिभा काविताला म्हणाली तुला वेड लागलय ! अस कस होऊ शकत ? जो गेल्या वर्षभर माझ्या मागे लागलाय त्याच्यासमोर मी स्वतः हून प्रेमाचा प्रस्ताव ठेवल्यानंतरही तो नाही म्हणेल हे कस शक्य आहे ? हे केवळ अशक्यच आहे ? त्यावर कविता आत्मविश्वासाने प्रतिभाला म्हणाली ,’’ लाव पैंज लाव तू उद्याच त्याच्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवायचा, त्याने जर तुझा प्रेमाचा प्रस्ताव नाकारला तर तू त्याचा नाद सोडायचा आणि त्याने जर तुझ्या प्रेमाचा स्विकार केला तर मी आयुष्यभर मी तू बोललेल ऐकत राहिण ! प्रतिभान कविताची पैंज मान्य केली आणि रिक्षामधून उतरताच दोघी दोन विरुध्द दिशांना निघून गेल्या.
दुसर्या दिवशी बसस्टॉपवर त्या दोघी एकत्रच आल्या, तो प्रतिभाची वाट पाह्त बसस्टॉपवर उभा होता. प्रतिभा हिंमत करून त्याच्या जवळ गेली आणि त्याला म्हणाली,’’ मला जरा तुझ्याशी बोलायचय जरा बाजुला येता का ? त्याने मानेनेच होकार दिला. ती त्याला बसस्टॉपपासून दूर घेऊन जात म्हणाली,’’ मला माहीत आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तू माझी वाट पाह्त बसस्टॉपवर उभा असतो. मला ही तुंम्ही आवडता त्याचा हात हातात घेत ती ‘’ आय लव्ह यू’ म्ह्णताच तिचा हात हातातून झटकत तो म्हणाला,’’ बट ! आय हेट यू ! क्षणभर प्रतिभाला काय कराव आणि काय करू नये तेच कळ्त नव्ह्त. ती भानावर येईपर्यत तो रिक्षा पकडून निघूनही गेला. प्रतिभाच्या खांद्यावर कविताचा हात होता. तो हात न उचलताच कविता प्रतिभाला म्हणाली,’’प्रतिभा तू पैंज हारलेस आता तुला त्याचा नाद सोडावाच लागेल. आता तू म्हणशिल मला त्याचा नाद कधीही लागला नव्ह्ता ते खर ही आहे पण तो खर्या तूला आता लागेल ! त्यावर प्रतिभाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याचा विचार करत करतच ती तिच्या घरीही पोह्चली. काही केल्या तो तिच्या डोक्यातून जात नव्ह्ता. तो मला नाही म्हणूच कसा शकतो ? हा प्रश्न ती वारंवार स्वतःला विचारून त्रास करून घेत होती. मनातल्या मनात त्याला शिव्याही देत होती. साला ! दिड दमडीचा ! मला नाही म्ह्णाला ! गेले वर्षभर माझ्या मागे कुत्र्यासारखा शेपूट हालवत फिरत होता आणि आता ऐन वेळी धोका दिला साल्याने ! त्या कवितासमोर माझा पोपट केला. आता आयुष्यभर त्या कवितासमोर मान खाली घालून उभ राहवं लागणार आहे. पण ! आमच्या शुल्लक पैंजेसाठी कवितान आयुष्यभर माझं ऐकण्याच मान्य केल असल तरी ती जिंकणार याची तिला पूर्ण खात्री असल्याच तिच्या बोलण्यावरून तरी स्पष्ट जाणवत होत. मी हारल्यास तिन माझ्याकडून त्याच्या नादाला न लागण्याच वचन घेतल. याचा अर्थ मी त्याच्या नादाला लागण कविताला मान्य नव्ह्त. पण का ? कविता तर दिसायला माझ्यापेक्षा सुंदर आहे श्रीमंतही आहे उच्चशिक्षीतही आहे आणि नोकरीलाही चांगली आहे. तिला या सडकछाप माणसामध्ये काय रस असणार ? सांगता येत नाही ! त्याच्या आजुबाजूला घुटमलणारया पैकी ही ही एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझी आणि तिची मैत्री चार – पाच महिन्यांची मी तरी तिला तशी नीट कोठे ओळखते ? तिन माझ्या नकळ्त माझ्या सोबत राहूनच तर माझा काटा काढला नाही ना ? प्रतिभाच डोक काम करेनास झालयं ! कविता म्हणत होती ते बरोबरच होत वर्षभर मला त्याचा नाद लागला नव्ह्ता पण आता मला त्याचा नाद लागलाय !
यापुढे कवितासोबत त्याच्या बद्दल बोलण पूर्णपणे बंद ! आता तो काय करतो ते पाहू या ! दुसर्या दिवशी त्या दोघी एकत्रच बसस्टॉपवर आल्या पण ! तो दिसला नाही. तो न दिसल्यामुळे प्रतिभा किंचित कासाविस झाली. पण ! कविता समोर काहीच बोलली नाही. घरी गेल्यावर मात्र तिच मन अधिकच बेचैन झाल. त्याला पाह्ण्याची तिलाही किती सवय झाली होती हे तिच्या लक्षात आल. ती मनात पुटपुटली त्याचा एखादा फोटो जवळ असता तर किती बर झाल असत. फोटो सोडा आपल्याला तर त्याच साध नावही माहीत नाही. मी पण कीती मुर्ख आहे वर्षभरात त्याच साध नावही जाणून घेतल नाही. पण ! तसा प्रयत्न आता करावा लागेल. त्याच्या बाजूला ज्या कोंबडया उभ्या असतात त्यातीलच एखादीला पकडून बोलत कराव लागेल ! त्यानंतर काही दिवसांनी प्रतिभा आणि कविता सोबत असताना तो त्यांना सामोरा आला कविता आणि तो एकामेकांकडे ज्या नजरेने पाह्त होते ते पाह्ता प्रतिभाच्या मनात शंकेची पाल पुन्हा चुकचुकली ! त्या दोघांमध्ये काहीतरी मोठी भानगड आहे हे प्रतिभान अचूक हेरल आणि त्याच्या बाबतीत थोडा वेगळा मार्ग अवलंबण्याचा तिने निर्णय घेतला.
काही दिवसानंतर जेंव्हा तो प्रतिभाला बसस्टॉपवर एकटाच उभा असताना दिसला तेंव्हा त्याला पुन्हा बाजुला घेत प्रतिभा म्हणली,’’ मला माफ कर ! माझाच काहीतरी गैरसमज झाला असेल, मला माफ करा प्लीज ! त्यावर तो किंचित हसत म्हणाला,’’ ठिक आहे प्रतिभा ! त्यावर प्रतिभा म्हणाली,’’तुला माझ नाव माहीत आहे ? त्यावर तो म्हणाला,’’तुझच काय तुझ्या घरातील सर्वांचीच नावे मला माहीत आहेत. तुझ्या मोठ्या भावाच, बहीणीच, आई- वडीलांची सर्वांची नावे मला माहीत आहेत. त्यावर प्रतिभा चटकण म्हणाली पण ! मला तुझ नाव माहीत नाही. माझ नाव विजय जाधव त्याने तिच्या हातात एक विझीटींग कार्ड दिलं ज्यावरून तो पत्रकार आणि लेखक असल्याच लक्षात येत होत. त्याच नाव कळताच त्याचे अनेक लेख तिने वर्तमानपत्रात वाचल्याचे प्रतिभाच्या लक्षात आले. तो तिच्याशी बोलत होता या संधीचा फायदा उचलत तिने त्याची शक्य तेवढी सर्व माहीती काढून घेण्याचा प्रयत्न केला. तो निघून गेल्यावरही प्रतिभा बसस्टॉपवर थांबली कारण तिला कविताला गाटायच होत. कविता बसस्टॉपवर येताच प्रतिभा तिला म्हणाली,’’ त्याच नाव विजय जाधव आहे तो एक चांगला पत्रकार आणि लेखक आहे. चेहर्यावरून वाटत नाही ना तो लेखक असेल अस ? त्यावर रागावून कविता म्हणाली,’’ चेहर्यावरून तो काहीच वाटत नसला तरी त्याच्या चेहर्यामागेच दडल असेल बरच काही कदाचित ! त्यादिवशी प्रतिभान विजयने तिला दिलेल्या कार्डवरील मोबाईल नंबर आपल्या मोबाईलवरून लावण्याचा प्रयत्न केला पण तो नंबर अस्तित्वातच नव्हता. आता त्याच निदान नाव तरी कळल्याचा आनंद प्रतिभाच्या चेहर्यावर झळकत होता. पण ! आता प्रतिभाच्या मनात एक नवीन प्रश्न निर्माण झाला,’’ त्याच माझ्यावर प्रेम नव्हत तर तो माझ्या मागे का लागला होता ? प्रतिभाला आता या प्रश्नाच उत्तर शोधायच होत. पण कस ? आता तो पुन्हा भेटेल तेंव्हा त्याला स्पष्टच विचारू की !
त्यानंतर काही दिवसानी विजय एकटाच बसस्टॉपवर उभा होता. त्या संधीचा फायदा उचलत प्रतिभा हळूच त्याच्या बाजूला जाऊन उभी राहीली आणि गोड आवाजात म्हणाली,’’ राग येणार नसेल तर एक विचारू ? त्यावर त्याने मानेनेच होकार देताच ती म्हणाली,’’ तुला माझ्यात काही रस नव्ह्ता तर मग माझ्या मागे का लागला होतात ? त्यावर विजय म्हणाला,’’ माझ्या कथेला एक नवीन नायिका ह्वी होती . तुझी मी माझ्या कथेची नवीन नायिका म्हणून निवड केली होती. तुझ चालणं, बोलणं, ह्सणं, रूसणं, लाजणं आणि रडणं ही सारच मला माझ्या नायिकेत उतरवावयाच होत म्हणून ! तुंम्ही कथा ही लिहता ? हो शाळेत असल्यापासून ! फक्त लिहता की प्रकाशितही करता ? राज्यस्तरीय कथास्पर्धांमध्ये माझ्या कथांना अनेक बक्षीस मिळालेत. प्रतिभाला क्षणभर काय बोलाव आणि काय नाही तेच कळत नव्ह्त. पण स्वतःला सावरत प्रतिभा म्ह्णाली,’ मग ! भेटली का तुला तुझ्या कथेतील नायिका माझ्यात ? त्यावर विजय म्हणाला,’ जिला एक वर्षात एक माणूस ओळखता येत नाही तर ती लोकांच्या मनात काय चाललय हे कस काय ओळाखणार ? लोकांच्या वेदना ज्याला क्षणात ओळखता येतात तोच खरा माणूस. एखाद्याची वेदना कळायला जर डॉक्टरला एक वर्ष लागला तर डॉक्टरला कदाचित त्याच्यावर उपचार करण्याची गरजच भासणार नाही. मी तुझ्या मागे वेडा झालोय हे पाहताना तुला आनंद होत होता ना ? एक असूरी आनंद ज्यामुळे तू मला खेळण समजून माझ्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत होतीस. मी तुझ्यासाठी रोज खर्च करत असलेल्या तासांची किंमत तुला माहीत नव्हती. ती जर तुला माहीत असती तर तुला कळल असत मी तुझ्यावर काय उधळलय ते ? इतक्यात बस येताच तो तिला बाय करून निघून गेल्यावर प्रतिभा स्वतःशिच म्हणाली,’’ आता कळतय कविता का म्हणाली की त्याच्या नादाला लागू नकोस ? आता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्या त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.
— निलेश बामणे
Leave a Reply