निघालास बाप्पा.. ठीक आहे..
चल.. आवराआवर कर
जाता जाता जमलंच तर
मला थोडं लहान कर
मागे वळून बघायचंय
मला थोडं जगायचंय
निसटलेल्या आनंदाला
पुन्हा एकदा अनुभवायचंय
फुलपाखरं पतंग भवरा गोट्या
हेच तर सगळं विश्व होतं
छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद
असं काहीसं चित्र होतं
आता मोठ्या गोष्टी देखील
छोटा पण आनंद देत नाहीत
लाख जुळवून घ्यावं तरी
मनं पूर्ण जुळत नाहीत
आताशा स्पर्धेत धावतांना
धावणंच फक्त जाणवतं
हाती काहीच लागत नाही
सारं.. फक्त उणावतं
करिअर प्रमोशन गाडी बंगला
यातून बाहेर पडायचंय
मॅनर्स एटिकेट्स फेकून देऊन
पुन्हा मनमोकळं जगायचंय
उरलेल्या आयुष्यात सरलेलं
आयुष्य पुन्हा जगायचंय
जमलं तर प्लीज बाप्पा
एवढं तुला करायचंय
माहित आहे तुझ्याकडे
रिवाईंडचं बटन नाही
पण तुला मनातलं बोलल्याशिवाय
मला देखील राहवत नाही !
… मोरया
Forwarded post from Whatsapp
Leave a Reply