सीन नं – 1 वेळ – रात्रीची ठिकाण – निर्जन रस्ता
( बॅकग्राऊंडला रातकीड्यांचा वैगरे आवाज येतोय )
एक तरुणी ( जॉब वरून आलेली ) रस्त्याने हातात मोबाईल घेऊन चालतेय. ती दोन चार पावले चालल्यानंतर तिचा मोबाईल वाचतो …
ती तरुणीः- मोबाईलवर… हा ! आई बोल अगं ! आज ऑफीसमध्ये जरा जास्तच काम होत त्यात ट्रॅफीक जाम आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्ह्णून नेमक्या आज ट्रेन पण लेट होत्या… तू काळजी करू नकोस मी आता रेल्वे स्टेशनच्या बाहेरच आहे रिक्षा पकडतेय येईन अर्ध्या तासात बाबांनाही सांग तसे ! ओके ! ओके ! चल बाय … मी ठेवते फोन…
ती रस्त्याच्या कडेला थांबून रिक्षावाल्याला हात दाखविते तिच्या समोरून न थांबता तीन रिक्षा निघून जातात. त्यानंतर एक रिक्षावाला थांबतो…
ती तरूणीः- भाऊ शिवाजीनगर !
रिक्षावालाः- नाही ! ( बोलून तो सरळ निघून जातो ती रागाने पाय आपटते.)
इतक्यात दुसरा रिक्षावाला येतो
ती तरूणीः- भाऊ शिवाजीनगर !
रिक्षावालाः- ताई माझ्या रिक्षाचा गॅस संपत आलाय !
इतक्यात समोरून स्लो मोशन मधे तीन रिक्षा निघून जातात त्या तिन्ही रिक्षांना ती हात दाखविते पण त्या थांबत नाही
त्यातील पहिल्या रिक्षात एक तरुणी असते ( अकुड कपड्यातील हातात सिगारेट असणारी )
दुसर्या रिक्षात दोन तरूणी असतात
आणि तीसर्या रिक्षात एक जोडप असत म्हातारा म्हातारीच…
त्यानंतर ती आणखी एका रिक्षावाल्याला थांबते भाऊ शिवाजीनगर…
रिक्षावालाः- मॅडम शंभर रुपये होतील ! अहो पण् मीटर प्रमाणे पन्नास रुपयेच होतात.
रिक्षावालाः पण या वेळेला तुम्हाला दुसरा रिक्षा भेटणार आहे का ? ते काही नाही शंभर रुपये देणार असाल तर बोला नाहीतर उगाच आपला टाईम खोटी करू नका !
ती थोडा वेळ विचार करते आणि बोलते ठिक आहे ! जा तुंम्ही !
पडलेला चेहर्याने रिक्षावाला निघून जातो ती जाणार्या रिक्षाकडे पहात रागाने पाय आपटते आणि रस्त्याने चालू लागते…
रस्त्याने चालताना तिला पावलांचा आवाज येतो कोणी तरी आपला पाठलाग करत असल्याचे तिला जाणवते ती चालताना थांबते आणि मागे वळून पाहते तर तीन तरूण (गुंड ) तिचा पाठलाग करत असतात त्या तिघांच्याही हातात बिअरच्या बाटल्या असतात तिचा पाठलाग करता त्यांच्यात संवाद सुरू असतो
पहिला तरूणः काय आयटम आहे ?
दुसरा तरूणः काय माल आहे ?
तिसरा तरूणः काय फटाका आहे ?
पहिला तरुणः सभ्य दिसतेय…
दुसरा तरूणः एवढ्या रात्री एकटी काय करतेय ?
तिसरा तरूणः आपल्याला काय ? टाईमपासला चालेल…
पहिला चला तिच्याशी बोलू या ! ( दोघे होकार देतात आणि भराभरा चालू लागतात त्यांना आपल्या दिशेने वेगात येताना पाहुन ती तरुणी घाबरते आणि जवळ- जवळ धाऊ लागते धावता धावता ती एका बाईकला धडकते आणि खाली कोसळते.
त्या बाईकवरून एक तरूण उतरतो आणि आपला हेलमेट काढून बाईकला आडकवतो ( दाढी मिशा वाढलेला ) त्या तरूणीला हात देऊन उठवतो …
तरूण ( हिरो ) – काय मॅडम जीव दयायला माझीच गाडी सापडली ?
ती तरूणीः नाही तस नाही ! ते तीन गुंड माझा पाठलाग करता आहेत… इतक्यात ते तिघे जवळ येतात आणि त्यांच्याकडे रागाने पाहतात आणि…
पहिला तरूणः ए मजनू चल निघ !
दुसरा तरुणः ही काय तुझी बहिण लागते काय ?
तिसरा तरूणः उगाच मारला जाशील ! जीव प्यारा असेल तर निघ …
तो तरूण त्याच्या दिशेने चालत जातो त्यांच्यात हातापाई होते त्या तिघांना तो बदडवतो ते तिघे पळतात… तो तरुण पुन्हा त्या तरुणीजवळ येतो ती तरुणी – थॅन्क यू ! तुम्ही आलात म्ह्णून मी आज वाचले !
तो तरूणः- आज नशीबाने मी भेटलो म्ह्णून तू वाचलीस पण प्रत्येक वेळी मी असेनच असे नाही मला कळत नाही तुम्ही मुली स्वतःल इंडीपुन्डेंट वुमन म्ह्णवून घेता मग ! पुरूषापासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी तुंम्हाला मदतीला एक पुरुषच का लागतो आजही तुंम्ही तुमच्या बापाने, मुलाने, नवर्याने अथवा भावाने तुमच संरक्षण करावे अशी अपेक्षा का करता ? तुम्ही स्वतः स्वतःच संरक्षण करायला सिध्द का होत नाहीत ?
ती तरूणीः- तुम्ही बोलताय ते बरोबर आहे मी या गोष्टीचा नक्कीच विचार करेन !
तो तरूणः बर ! तुम्हाला कोठे जायचय !
ती तरुणीः शिवाजीनगर !
तो समोरून येणार्या रिक्षाला हात दाखवतो रिक्षा थांबते
तो तरूण मॅडमना शिवाजीनगरला सोड ! ती रिक्षा बसते थॅन्कस अगैन ! म्ह्णून त्याला बाय करून रिक्षातून निघून जाते….
सीन नं. 2 वेळः रात्रीची ठिकाणः तोच निर्जन रस्ता
घाबरलेली एक तरुणी रस्त्याने धावतेय ते तीन गुंड तरूणच दुसर्या तरुणीचा पाठलाग करता आहेत ती तरुणी समोरून येणार्या एका स्कुटीला धडकते. ती तरूणी कोसळताता स्कुटीवरून एक तरूणी उतरते आपला हेल्मेट काढते हि तिच तरुणी ( हिरोईन ) असते जिचा पूर्वी या गुंडानी पाठलाग केलेला असतो ती तिला उठवते ते तिघे त्यांच्या जवळ येतात
पहिला तरूणः आज डबल धमाका आहे.
दुसरा तरूणः आज दिवाळी होणार…
तिसरा तरूणः आज मजा येणार…
ते तिघे त्यांच्या जवळ येतात एक त्या दुसर्या तरूणीचा हात पकडून ओढण्याचा प्रयत्न करतो. दुसरा पहिल्या तरूणीला मागून कंबरेत पकडतो आणि तिसरा समोरून तिच्यावर हात टाकणार तोच ती त्याला लाथ ( गुप्तांगावर ) घालते. तो तिथेच पडतो. त्यानंतर ती त्या तिघांना तुडवते. ते तिघे पळून गेल्यावर ती तरूणी तिला आपल्या स्कुटीवर मागे बसायला सांगते आणि स्कूटी सुरू होते…
सीन नं. 3 ठिकाण – घर
दुसरी तरूणी दारावरची बेल वाजवते
दरवाजा उगडते दरवाजात तो तरूण उभा असतो ( हिरो ) ती लगेच त्याला मिठी मारते आणि रडत म्ह्णते दादा आज रस्त्यात तीन गुंड माझा पाठलाग करत होते ही होती म्ह्णून माझा जीव वाचला तिला पाहून त्याला आश्चर्य वाटते ती तो तिला थॅन्कस म्ह्णतो त्यावर ती म्ह्णते, थॅन्क काय एकदा तुम्ही मला वाचवले होते तेंव्हा तुम्ही दिलेला उपदेश मी मनावर घेतला आणि स्वसंरक्षणाचे धडे गिरवले म्ह्णूनच मी आज तुमच्या बहिणीचे रक्षण करू शकले ती तिच्याकडे पाहात म्ह्णाली,’’ तुझा भाऊ तुझ रक्षण करायला समर्थ असला तरी तू ही स्वसंरक्षणाचे धडे घे ! कारण आपल्या बलात्काराची शिकार होणारी निर्भया नाही तर पुरुषांतील गुंड प्रवृत्तीशी निर्भयपणे दोन हात करणारी तरूणी व्हायचे आहे. ते दोघे हसत मानेनेच होकार देतात चला ! मी निघते बाय ! ( तिला मिठी मारते ) ती निघते…
सीन नं. -4 ठिकाण – घरासमोरचा रस्ता
आपल्या स्कुटीवर बसताना ती त्या दोघांना बाय करते… हेल्मेट घालते स्कुटी रस्त्याने चालताना त्या स्कुटीच्या पाठी मागे तिचे नाव लिहलेले असते… निर्भया …..
‘समाप्त’
लेखक – निलेश बामणे
Leave a Reply