हिंदीचे आदि कवी अमीर खुसरोंनी खड़ीबोलीमधे (हिंदीची बोली जी दिल्ली -मेरठ भागात बोलली जाते) दोन पूर्णतया भिन्न वस्तुंमधे सम्बन्ध अर्थात समानता दाखविण्यासाठी ‘निसबत’ हा प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकार हिंदीत आणला होता- त्यांच्याच एका ‘निसबतचा’ मराठी अनुवाद:
मुर्गा आणि बादशाह
बादशाह और मुर्ग में क्या निसबत है. दोनों ‘ताज’ पहनते हैं.
मराठी अनुवाद
बादशाह आणि कोंबडयामधे आहे काय सम्बन्ध. दोघांच्या डोक्यावर ‘ताज’ (मुकुट) असतो.
युग बदलला- कालचा बादशाह आजचा नेता झाला आहे. नेत्याचा सम्बन्ध कुठल्या प्राण्याशी दाखविता येईल. सरडयाशी ? पहा:-
नेता आणि सरडा
नेता आणि सरडयामधे आहे काय सम्बन्ध. सन्धी-साधू दोघ, बदलतात अपुले रंग.
सरडया प्रमाणे नेताही रंग (पार्टी) बदलतो. कधी तो भगवा होतो, कधी हिरवा, कधी नीळा तर कधी चक्क रंगहीन अर्थात धर्मनिरपेक्ष होतो.
त्याच प्रमाणे नेत्याचा सम्बन्ध रेडयाशी दाखविता येतो:-
नेता आणि रेडा
नेता आणि रेड्यामधे आहे काय सम्बन्ध. जाडपोती दोघ खातात ‘चारा’ सदैव.
(इथे ‘चारा’ ही दोघांतली समानता आहे).
— विवेक पटाईत
Leave a Reply