नवीन लेखन...

निसर्गाची ध्यान प्रक्रिया

खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता  ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला. ध्य़ान प्रक्रिया साध्य होण्यासाठी गुरुची अवशक्ता लागते कां ?  सर्व साधारण साधकासाठी, व्यक्तिसाठी निश्चीत. परंतु शेवटी ही एक नैसर्गिक क्रिया ठरते. ज्याना उत्स्फूर्त शांतता प्राप्त करायची असते, ते शरीराला हालचालविरहीत करतात. मनाला लगाम लावतात. मग ती व्यक्ती असो वा प्राणी. प्राण्यालाही मन असते, भवना असतात. निसर्ग ही कला त्यांच्या प्रयत्नाना देतो. या प्रक्रियेत त्याना निश्चित आनंद, समाधान, आणि चेतना प्राप्त होते. एकदा सहज मिळालेला आनुभव ते सोडीत नसतात. ज्याचे आनंदी परिणाम त्यानी जाणले, त्याच गोष्टींची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

जीवाच्या आत्म्यातच त्या ईश्वराचे अंशाने अस्तित्व असते. प्राण्यांच्या सर्व हालचाली त्याचा देह सुदृढ व कार्यारत ठेवण्यासाठीच असतो. निद्रा वा विश्रांति ही शरीराला तजेलेदार, उत्साहित ठेवते. खरय़ा निद्रेचे चक्र जर बघितले तर प्रथम शरीर शिथील होते. नंतर मन शांत होणे, व निद्रा लागणे हे घडते. मन शांत होण्यांत अनेक अडचणी व वेळ लागतो. कारण ते वैचारिक लाटांत धावत असते. ज्याला स्वप्नावस्था म्हणतात. ही अवस्था क्वचित् आठवणीत राहते.

ह्या सारय़ा हलचालीमधूनही एका अवस्थेतून देह  व मन एकरुप होऊन त्याच्याच आत्म्याशी संवाद साधतो. येथे देह मृत स्थितीस्वरुप असतो. मन पूर्ण अविचल झालेले असते. देहमन खरय़ा अर्थाने आत्म्याजवळ गेलेले असतात. जीव संपूर्ण जगाला विसरला, पारखा झालेला असतो. हे सारे क्षणिक असते. हाच तो ईश्वरी सान्निध्याचा क्षण. ह्याच त्या अवस्थेत आत्म्याला चेतना मिळते. ज्यासाठी प्रत्येक जीव धडपडत असतो. हे जरी क्षणिक असले, तरी हे सर्व साधारण दैनंदिन असते. प्रत्येक जीवांत ह्याच पद्धतीने अजाणतेपणाने ईश्वराचे सान्निध्य मिळते व चेतना प्राप्त होते. आनंद, समाधान आणि चेतना ( उत्साह ) ह्यांचा सामुहिक परिणाम   Ecstasy of Joy  म्हणतात. तो क्षण गाढ निद्रावस्था  Deep Sleep यानेच साधला जातो.

दुर्दैवाने त्या अनमोल क्षणाचे पकड सुटतांच, देह अस्थित्वाच्या जाणिवेमध्ये उतरतो. आठवणीची नोंद न होता, त्याची दैनंदिनी चालू होते. व्यक्त होतो तो आनंदी परिणाम-चैतन्य. ऋषी, संत महात्मे, थोर व्यक्ती, ध्यान धारणा, समाधीयोग यांची महती अनुभवाने गातात. जागृत राहून याचा आनंद घ्या म्हणतात. सत्य आहे. परंतु सामान्यांसाठी कठीण. निसर्गानेच कदाचित् सर्व जिवीत प्राण्यासाठीं गाढ निद्रेच्या मार्गातून, अवस्थेतून धान परिणाम साध्य करण्याचे योजीले नसेल कां ?

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..