“शिवरायाचे आठवावे स्वरुप, शिवरायाचा आठवावा साक्षेप. शिवरायाचा आठवावा प्रताप, भूमंडळी”. हा उपदेश समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना केला. तरी आपण सर्वांनी हा उपदेश लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही क्रांतिकारकाचे/सज्जनाचे आराध्य शिवाजी महाराज होते(आहेत?). शिवाजी म्हणजे जगण्याची पद्धत. शिवाजी महाराजांसारखे जगावे, म्हणजे प्रामाणीकपणे जगावे. आपण म्हणतो शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात. आजच्या जीवनात शिवाजी कुणालाही परवडणार नाही. कारण शिवाजी म्हणजेच प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा आपल्या राष्ट्राशी, आपल्या भूमातेशी, आईशी. असे म्हणतात माणूस कितीही वाईट असला तरी तो आपल्य़ा आईला फसवणार नाही. राष्ट्राला “आई” म्हणण्याची प्रथाच आपण मोडून काढली आहे. त्याची कुजलेली फ़ळे आज आपण भोगतोय. आज नेते आणि अधिकारी इतके भ्रष्ट झाले आहेत की पुढे जाऊन भारताचे नाव भ्रष्टाचारासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल की काय, असे वाटू लागलेय.मालाडमध्ये असाच अनुभव येतोय. पी उत्तर विभागाचे आयुक्त शब्बीर बारगीर यांनी सर्व नियम, अटी, धाब्यावर बसवून स्वतःचे खीसे भरण्यासाठी निसर्गरम्य असलेल्या मालाड परिसराचे कॉंक्रीडचे जंगल केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जमीनीवर भूमाफियांना हाताशी धरुन अनेक अवैध बांधकाम करून करोडो रुपयाची माया जमवली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे दीन/गरीबांचे कैवारी होते. शब्बीर बारगीर हे श्रीमंतांचे/हरामखोरांचे कैवारी आहेत. गरीबांच्या झोपडीवर बुलडोझर फिरवणारे व श्रीमंतांचे बहुमजली अनधिकृत बंगले, हॉटेस्ल बांधणारे शब्बीर बारगीर यांच्या विरोधात पहिल्यांदा मालाड येथील कार्यरत असणारे साप्ताहीक “प्रतिकार संदेश” ने प्रथम विरोध केला. प्रतिकार संदेशचे संपादक अरुण जुन्नरक र आणि सहसंपादक रोहित होले यांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता लोकशाही मार्गाने शब्बीर बारगीरांचा निषेध केला. त्यांच्या साप्ताहीकात शब्बीरांचे कंसकृत्य उघड केले. इतकेच नव्हे तर स्वतः संपादक अरुण जुन्नरकर शब्बीरांना भेटायला गेले व त्यांनी शब्बीरांना जाब विचारला. हे ऎकून शब्बीर (नव्हे गब्बर) इतके संतापले की ते अरेरावी करू लागले. असे असूनही जुन्नरकर शांतपणे त्यांचे बोलणे ऎकत होते व अतिशय सनदशीरपणे आपल्य़ा साप्ताहीकमध्ये त्यांचे उघड केलेले कृत्य दाखवले. “आम्ही अशाच लोकशाही पद्धतीने आमचा लढा चालू ठेऊ” असे जुन्नरकरांनी ठणकावून सांगितले. पण का कुणास ठाऊक, जुन्नरकरांच्या सज्जनपणामुळे शब्बीर बारगीर यांचे मानसिक संतूलन बिघडले व त्यांनी त्यांनी साप्ताहीक/पेपर जुन्नरकरांच्या तोंडावर फेकून मारले आणि म्हणाले “आम्ही कुणालाही घाबरत नाही, जे करायचे आहे ते करा”. ही घटना दिसते तेव्हढी साधी नाही. याचा भिषण परिणाम होऊ शकतो, होत आहे. शब्बीर बारगीर यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आघात केला आहे. आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेचा अपमान केला आहे. याची त्यांना फळे भोगावीच लागणार. पण आपण सर्व मालाडवासियांनी “प्रतिकार संदेश” आणि अरुण जुन्नरकर यांच्या पाठीशी उभे राहायला पाहिजे. हा लढा केवळ जुन्नरकरांचा राहिला नसून आता हा लढा जनतेचा लढा झाला आहे. शब्बीर बारगीर हे अतिशय भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शासन झालेच पाहिजे आणि होणार. पी. जी(public grevience) मध्ये जनतेला भेटण्यासाठी दर सोमवार हा दिवस ठरवला आहे. पण बारगीर आल्यापासून ते फक्त महिन्यातून एकदाच भेटतात. आणि वर मुजोरपणे म्हणतात की “भेटण्याच्या आधी नागरिकांनी तक्रार नोंदवावी. कनिष्ठ अधिकार्यांना भेटावे व तेथे काम झाले नाही तरच माझ्याकडे या”. तक्रार नोंदवण्यामध्ये जवळ जवळ एक महिन ा जातो आणि तोपर्यांत ज्या बिल्डरच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे, तो बांधकामावर स्टे आणतो. अशा रितीने जनता-जनार्दनेचा घोर अपमान केला जातोय. जनतेच्या तक्रारींना कचर्याची टोपली दाखवली जातेय. शासन मूग गिळून बसलेय. शिवरायांच्या काळात शासन म्हटले की लोक घाबरायचे. कारण तेव्हा खरोखरीच शासन व्हायचे. पण आता सगळे मजेत आहेत. रेटता येईल तेव्हढे रेटायच. आम्हाला एक गोष्ट कळत नाही ह्यांना झोपा लागतात तरी कशा? अहो नकळतपणे दुसर्याचे साधे नुकसान जरी केले तरी आम्ही अस्वस्थ होतो. पण ह्यांना बहूधा भस्म्या रोग झालेला दिसतोय. भारताला स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षे झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच. पण शब्बीर बारगीर सारख्या हरामखोर आणि माजोरड्या लोकांनी स्वतःच्या वैयक्तीक फायद्यासाठी पवित्र घटनेत अनेक वेळा बदल केला आहे. पण त्याचा फायदा जनतेला शुन्यच.आपण किती दिवस हा अत्याचार सहन करणार आहोत? कधी ना कधी तरी ह्याविरोधात पेटून उठायलाच पाहिजे, मग आत्ताच का नाही? आपण सर्वांनी अरुण जुन्नरकर यांच्या सोबत हा लढा द्यायला पाहिजे. ह्यात त्यांचा वैयक्तिक फायदा नाही. परंतू जनतेला न्याय मिळावे म्हणून “प्रतिकार संदेश” कार्यरत आहे. आपण सर्वांनी मिळून सहकार्य केले तर शब्बीर सारख्या जनतेच्या पैशांवर मजा मारणार्या गोंड्याच्या कातडीच्या भ्रष्टाचारी लोकांचा बुरखा फ़ाडू शकतो. त्यासाठी शिवाजी महाराजांना आठवावं लागेल. त्यांचा प्रताप आठवावा लागेल. आज ते काम मालाड मध्ये प्रतिकार संदेश करत आहेत. तर मग या, मालाड वासियांनो लोकशाही मार्गाने हराखोरांचा(शब्बीर बारगीरांचा) प्रतिकार करूया. सशक्त आणि समृद्ध मालाड बनवूया.लेखक: जयेश मेस्त्रीईपत्ता: smartboy.mestry5@gmail.com
— जयेश मेस्त्री
Leave a Reply