वाटले होते मला एकेकाळी
घेण्यासाठी तुझी सही
माणसांच्या गराड्यातून
रस्ता काढत यावे लागेल
तुझ्या पर्यंत…
पण तसे काहीच झाले नाही
तू हि निघालीस
एक स्त्री सर्वसामान्यच…
कौतुक होते मला
तुझ्यातील निडरपणाचे
तुझ्या दिसण्याचे
आणि बोलण्याचे गोड …
मी तेव्हा मानत होतो
स्वत :स एक गरीब मुलगा
राजकुमारीच्या पडलेला प्रेमात …
काळ बदलला तू ही बदललीस
मी ही बदललो
तुझ्या स्वप्नांची पंख
तू छाटलेली मी उचलली
आणि घेतली भरारी
तुझ्या स्वप्नांसह गगनात…
पाहतेस आता उडणाऱ्या
मला तू जेव्हा गगनात
म्हणतेस स्वत :स
मी आहे अजूनही
स्वप्नात…
कवी – निलेश बामणे
Leave a Reply