ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी
आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी
माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती
हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती
जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी
नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी
परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असताटिपून
घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***३
अस समजल जात की मुल गर्भांत वाढत असताना, वा जन्म होताक्षणी त्याच्या हालचाली मधून ज्या लहरी उत्पन्न होतात, जो आवाज ध्वनीत होतो, जणू एखादा हूंकार बाहेर पडून ऐकू येतो. तो असतो ‘सोहंम’ (तो मी आहे) – ‘कोहंम’ (मी कोण आहे) – ‘अहंम’ (मी आहे) ह्या प्रतिध्वनीमध्ये. शास्त्रकारांनी ह्या शब्दांचे वर्णन अप्रतीम व अतीशय योग्य पद्धतीने केलेले आढळते. ते नवजांत बालक जणू जगाला ह्या त्याच्यासाठी असलेल्या नव्या वातावरणाला ओरडून सांगते की ‘ बाबानो मी तोच आहे. मी कोण आहेस, मी आहे, ‘ अर्थात जीवनांत फक्त ‘मी’ ला जाणा
Leave a Reply