नवीन लेखन...

पक्षांना मेजवानी

 



मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.

मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचर्‍याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, “वेगळा आहार एक ट्रीट” त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी ***१७

मला माझ्या विक्षिप्त वागण्याची क्षमा कर

तुम्ही पायी चालत असाल, मी मात्र तुमच्या खांद्यावर

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..