नवीन लेखन...

पडवळ सांभार

दोडका, गोसाळे (गिलके), पडवळ या भाज्या ताटात दिसल्यानंतर कितीही भूक असली तरी पोटात जात नाहीत. हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव होता. फिरस्तीवर असताना ताटात जे येईल, ते खाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आणि यातूनच वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची वेगवेगळी चव घेत काही नावडत्या भाज्या देखील कायमसाठी आवडीच्या ठरल्या. त्यात पडवळचा समावेश करावा लागेल.

खरं तर, घाटावर पडवळ फारशी येत नाही. कोकण, मुंबई आणि कोल्हापूर, पुण्याचा काही भाग वगळता पडवळ बाजारात दिसत देखील नाही. या भाजीबद्दल असलेले कुतुहल मुंबईत वाढीस लागले आणि जेव्हा उत्सुकतेपोटी म्हणून घेतलेली पडवळ न खाता तशीच ठेवावी लागली. पण हीच पडवळ अधिक चांगलीदेखील करता येऊ शकते.

साहित्य – १०० ग्रॉम पडवळ, १ कप तूर डाळ, लिंबाएवढी चिंच, अर्धा लहान नारळ खवून खोबरं, २ मोठे कांदे, तळण्यास तेल तयार ठेवा. मसाला तयार करण्यासाठी ४ टेबल स्पून धने, अर्धा चमचा मेथी दाणे, ६ सुक्या मिरच्या, छोटा खडा हिंग, १ चमचा चणा दाळ हे सर्व गुलाब रंगावर तेलात १ चमचा राई आणि कढीपत्ता घालून त्यात परता. परतलेला मसाला वाटून घ्या. मसाल्याबरोबर खोबर्‍याचा किसही वाटा.

कृती – तूर डाळ मऊ शिजवून घ्या. चिंचेचा कोळ काढून घ्या. पडवळाचे लहान लहान तुकडे करा. ते चिंचेच्या रसात शिजवून घ्या. कांदा बारीक करुन परतावा. त्यात चिंचेच्या रसात भिजलेले पडवळाचे तुकडे घाला. आणि वरचा सर्व मसाला घालून चांगले ढवळा. त्यात शिजवलेली तूर डाळ घालून एकजीव करा. तेलात राई वाटल्यास उडीद दाळ, कढीपत्ता घालून फोडणी द्यावी आणि सांभार सारखे करा.

ही पाककृती एकदा करुन पाहा. नावडत्या भाजीचे रुपांतर आवडत्या भाजीत निश्चितपणे होईल!

— बावर्ची

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..