नवीन लेखन...

पद्मविभूषण पुरस्कार



पद्मविभूषण हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.

जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणार्‍या लोकांना

हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगीत करण्यात आला होता.

सुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसर्‍या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.

लगेचच दुसर्‍या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचं स्वरुप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढर्‍या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरुपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची रिबन लावलेली असते.

सन २०१० पर्यंत एकूण २६४ थोर व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिमान वाटावा अशी बाब म्हणजे दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या किंवा महाराष्ट्र

भूमी ही कार्यक्षेत्र असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्रातील पद्मविभूषणप्राप्त महान विभूतींची संख्या ४९ आहे, तर ५० दिल्लीवासियांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..