उन्हाळयाची चाहूल लागताच पुणे -मुंबई सारख्या शहरवासियांची मने थंड हवेच्या ठिकाणांचा वेध घेतात. रोजच्या धकाधकीच्या व कोंदट वातावरणातून चार घटका सुखाच्या कराव्या असा विचार त्यांच्या मनात डोकावतो.परंतु सर्वच पर्यटन स्थळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नसतात. वेळेच व मुल्यांची पूर्ण समाधान देणारी पर्यटन स्थळेच सर्वसामान्य निवडतो व यामुळे मुंबईच्या जवळ असलेल्या महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा,खंडाळा, या गिरीस्थानावर प्रचंड ताण निर्माण झाल्याने शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने रायगड जिल्ह्यात सहा पर्यटन स्थळे विकासासाठी मंजूर केली असून त्यामध्ये पेण तालुक्यात महल मिरा गिरीस्थान, खालापूर तालुक्यात गारमाळ, सुधागड तालुक्यात ताडगाव, मुरुड तालुक्यात केसवली, महालोक, पोलादपूर तालुक्यात कुडूपन आधुनिक काळातील ज्ञान प्रसाराची, दळणवळणाची साधने विकसित झाल्याने आधुनिक पर्यटन उद्योगास विशेष चालना मिळत आहे. पर्वत शिखरे, निर्मनुष्य समुद्र किनारे, निर्मनुष्य वन प्रदेश या उपेक्षीय गोष्टी पर्यटन क्षेत्रात येऊ लागल्या आहेत व त्या प्रथम दर्जाच्या आर्थिक सत्ता ठरत आहेत. पश्चिम घाटाच्या गिरीकंदरात महाराष्ट्रातील अनेक थंड हवेची ठिकाणे व ऐतिहासिक गड किल्ले दडलेले आहेत. त्या प्रत्येकावर छत्र धरणार्या पर्वतराजे तर जणू जादूच्या वातावरणात घेवून जातात. तिथली वृक्षराजी प्राणी जीवन निराश मनाला संजीवनी देतात. असा हा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद नेहमीच ठिकाणी घेण्यासाठी नवे आकर्षण निर्माण झाले आहे व ही दृष्टी सर्वसामान्य लोकांतही होऊ लागली आहे.आर्थिक दृष्टीकोनातून पर्यटन उद्योग महत्वाचा ठरतो. जुन्या पर्यटन स्थळांची व्यवस्था राखणे व नवीन पयर्टन स्थळे विकसित करणे ही पर्यटनाची अंगे होय.अनुषंगाने देशीपरदेशी पर्यटकांना आकृष्ट क णे यासाठी नियोजनपूर्वक प्रसिद्धी यंत्रणा उभी करणे, पर्यटकांच्या वाहतुकीची तसेच निवास भोजनाची सुखसोयी उपलब्ध करुन देणे हे देखील उद्योग महत्वाचे घटक ठरतात. पर्यटन उद्योगांमुळे सेवा उद्योगांना महत्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. पयर्टनांमुळे होणारा आणखी एक अतिशय महत्वाचा लाभ म्हणजे प्रमाणावर होणार्या रोजगार संधी. पर्यटन उद्योगापासून मिळणारा एक फायदा म्हणजे खास देशी बनावटीच्या हस्तकलात्मक वस्तू बनविणार्या लघुउद्योगांच्या व कुटीर उद्योगांच्या विकासास मिळणारे उत्तेजन आधुनिक अर्थशास्त्रीय परिभाषेत पर्यटक हा सामान्यत: ग्राहक व उपभोक्ता समजला जातो. <निवास व न्याहारी योजना:-महाराष्ट्र>
विजय ग. पवार
“महान्यूज”च्या सौजन्याने
— विजय ग. पवार
Leave a Reply