मागील वर्षी नागपूरमध्ये रामनगर स्थित खुल्या मैदानात आम्ही, मनपा नागपूर यांच्या सौजन्याने 38000 लिटर पाण्याचा कृत्रिम तलाव तयार करून, नागपूरकरांना पर्यावरणाचा विचार करून या तलावात गणेश मूर्ती विसर्जन करण्याचा आग्रह केला. आमच्या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला, व जवळपास 1600 ते 1700 गणपती लोकांनी या तलावात विसर्जित केले.
या वर्षी सुद्धा आम्ही अनंत चतुर्दशीला लोकांना असेच आवाहान केले, आणि विसर्जनाचा आकडा 2200 पार केला. सकाळी 9 पासून लोकांनी विसर्जनाची सुरवात केली व रात्री साडेअकरा पर्यंत लोकांचे लोंढे येतंच होते. आमच्या कार्याची महापौरांनी दखल घेतली, आणि पुढील वर्षापासून अजून चांगल्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले. मागील वर्षी आमच्या तलावात फक्त घरगुती गणपती आले होते, या वर्षी पाच फुटपर्यंतचे मंडळांचे, तसेच सोसायट्यांचे गणपती सुद्धा विसर्जित करून मंडळांनी आपले पर्यावरण प्रेम व्यक्त केले.
नेहेमी प्रमाणे काही नाठाळ अतिउच्च वर्गातील बुद्धयांक कमी असलेले लोक, आपल्या पंधरा वीस लाखाच्या गाड्या उडवत आले, आमच्याशी मुजोरी केली, आणि नैसर्गिक तलावात मूर्ती विसर्जित करून टेंम्बा मिरवत निघून गेले. गमतीचा भाग म्हणजे त्यांची शाळेत जाणारी मुले आपल्या आई वडिलांच्याकडे हताश नजरेने गाडीत पहात बसलेली दिसली. त्यांच्या नजरेत आई वडिलांच्यावरची किव स्पष्ट दिसत होती. यात मुजोरी करणाऱ्यात पुणे, सांगली येथील प्रख्यात सोने व्यापारी ज्यांनी काही वर्षांपूर्वी नागपूर मध्ये दुकान उघडले आहे हे सुद्धा होते. यांना सुशिक्षित म्हणायचे का याचा विचार करायची वेळ आली आहे. आश्चर्य म्हणजे एक उच्च शिक्षित प्रख्यात चर्म रोग तज्ज्ञ सुद्धा असेच वागले.
मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, गरीब तसेच झोपडपट्टीतील लोकांनी आमच्या कार्याला उस्फूर्द प्रतिसाद दिला, त्यांचे आम्ही आभारी आहोत. हेच लोक खऱ्या अर्थाने सुसंस्कृत, सुशिक्षित आहेत हे माझे मत पक्के झाले आहे. माझ्यासोबत नागपूरमधील प्रख्यात चार कॉलेजेसच्या जवळपास 100 गुणी विद्यार्थ्यांनी दिवसभर मेहनत केली, यात रायसोनी इंजिनीयरिंग कॉलेज, सिटी प्रीमियर कॉलेज, हिस्लॉप कॉलेज, आणि बिंझाणी महाविद्यालय, यांचा आवर्जून उल्लेख करतो. आम्ही प्रत्येक गणपती सोबत आमच्या तलावावर येणाऱ्या लोकांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत होतो, तसेच लहान मुलांचे (बच्चे कंपनी) पर्यावरण पूरक विसर्जन केल्याबद्दल चॉकलेट देऊन आभार मानले.
विजय लिमये (9326040204)
ईको फ्रेंडली लिविंग फाऊंडेशन
Leave a Reply