पावसा प्रमाणे दरवर्षी तरुनपण यावं.
नित नविन पालवीप्रमाणे प्रितीने फुलावं.
पसरावी चोहीकड़े प्रेमाची हीरवड़.
त्या हिरवड़ीत गार विचारांची दरवड़.
दरवड़णार्या सुगंधामध्ये मन पाखरू हरवावं.
नाजुक फुलांच्या गर्दीत सुंदर फुलांच उमलन,
उमललेल्या फुलाभोवती भ्रमराच भटकनं.
फुलानेही चुकुन कधी त्या भ्रमराच्या प्रेमात पड़ावं.
विचारांची देवानघेवान गार गार वार्यासोबत,
भेटीचे ते मधुर क्षण नदिकाठी पाण्यासोबत.
पाण्यासारखच निर्मळ त्याच तीच प्रेम असावं.
— आकाश
Leave a Reply