दुष्काळानंतरचा पाऊस गारवा देणारा असतो,
प्रेयसीने प्रियकराच्या जखमेवर प्रेमाने फुंकर घालावी तसा…
तापलेली जमिन पावसाने थंड झाल्यावर आनंदाने हिरवा शालू नेसते,
साखरपुड्यात नववधू नेसते तसा…
सृष्टीचे हे बदलेले रूप शेतकरी डोळेभरून पाहातो,
प्रियकर आपल्या प्रेयसीचे अप्रतीम सौंदर्य चोरून पाहातो तसा…
शेतकर्याच्या स्वप्नांना पावसात नवीन पालवी फुटून तो आनंदी होतो,
प्रेयसीशीच लग्न ठरल्यावर प्रियकर होतो तसा…
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
Leave a Reply