सिमेंटच्या जंगलात
पाऊस कधी येतो आणि कधी जातो
काही कळतच नाही…
घराबाहेर जाता- येताना आला तरच दिसतो
जास्तच कोसळला तर आम्ही
त्याला टी.व्ही वर पाहतो
आणि मग घराबाहेर जाणही टाळतो …
छत्री नव्हती म्हणून
पूर्वी पावसात भिजायचो
वह्या पुस्तके भिजली
म्हणून दु: खी व्हायचो ….
आता सर्दी – तापालाही घाबरतो
पावसापासून स्वत:ला जपतो
अगदी नखही भिजणार नाही
याची वेड्यागत काळजी वाहतो…
हल्ली प्रत्येक पावसाळ्यात
नवीन छत्री घेतो कित्येकदा
तर आमच्यामुळे त्या छात्रीलाही पावसात
भिजण्याच भाग्य लाभत नाही ….
पावसात भिजताना आमच्या कवितेतील
तिलाही पाहण हल्ली आम्ही टाळतो
ती मुसळधार पावसात भिजत असताना
आम्ही मात्र पी. व्ही. आर. मध्ये बसून
चित्रपटातील नायिकेला पाहत असतो भिजताना
डोळे वटारून पोपकोर्न खात…
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply