अवचित तो तर कोसळला
पाऊस आज मुसळधार
कडकडणार्या विजांसह
गडगडाटात मेघांच्या
धरल्या माझ्या सजनीने
कपडण्यांनिशीच ओल्या मग
पाऊस सरी भिजत भिजत
ओंजळीत त्या हातांच्या
पाहताच तिज भिजताना
आनंदाने पावसात
वेडावलेच मन माझे
आठवणीत त्या प्रेमाच्या
मिसळले अश्रू पावसात
खारट माझे पाण्यातच
वाहून पुढे मिसळण्यास
आनंदाश्रूत तिच्या
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply