पाऊस एकीकडे रूप आहे आनंदाचे
तर दुसरीकडे रक्त रंजित अश्रुंचे …
पाऊस एकीकडे कार्य करते सृजनाचे
तर दुसरीकडे नुकसान करते सृष्टीचे …
पाऊस एकीकडे पाणीरूपी जीवन देते
तर दुसरीकडे पाण्यात सर्वस्व डूबविते …
पाऊस एकीकडे शेतकऱ्यास झोप देते
तर दुसरीकडे पूरग्रस्तांची झोप उडविते …
पाऊस एकीकडे जीवनात सुख पेरते
तर दुसरीकडे नकळत दु:ख ओतते …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply