मुंबईत
कंठाशी आलेला मुंबईकरांचा जीव
पाऊस कोसळायला लागताच
एकदाचा भांड्यात पडला …
मुंबईत
आता पाणी टंचाई आणि घामाच्या धारांपासून
मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आनंद
मुंबईकरांनी पाऊसात भिजूनच व्यक्त केला …
मुंबईत
इतके दिवस ओस पडलेल्या
छत्र्यांच्या दुकानात आता कोठे
छत्र्या विकत घेण्यासाठी घोळका दिसू लागला …
मुंबईत
आता कोठे काळ्या पडलेल्या
मुंबईकरांच्या चेहऱ्यांवर
पावसाळा दिसू लागला …
मुंबईत
प्रेमिकांना एकत्र पावसात भिजत फिरताना
मिळणारा स्वर्गीय आनंद बरयाच
प्रतीक्षेनंतर का होईना मिळाल्याचा आनंद झाला …
मुंबईत
अचानक वातावरणातील अव्यक्त चिडचिड
नाहीशी होऊन सर्वत्र गारवा पसरला आणि
मुंबईकर खऱ्या अर्थाने पाऊसाच्या स्वागताला तयार झाला …
कवी – निलेश बामणे ( एन .डी .)
— निलेश बामणे
Leave a Reply