नवीन लेखन...

पाकिस्तानच्या कुरापती – आणि आमची सहनशिलता…..



जन्मापासूनच नतद्रष्ट, कुलक्षणी असलेल्या पाकिस्तान ह्या आमच्या शेजाऱ्याला, भारतविरोधी कारवाया करण्यात आनंद मिळतो. कितीतरी वेळा युद्धात तोंडघशी पडल्यावरही आपली वृत्ती न सोडता, नवनवे तंत्र वापरून भारतविरोधी अघोषित युद्ध सुरु ठेवले आहे. पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय. यांचे, भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे प्रकार जगासमोर येऊनही, हा देश अमेरिकन मदतीच्या भरवश्यावर घृणित कृत्य करीत आहे.

जगामध्ये आपले वर्चस्व टिकविण्यासाठी अमेरिका पाकिस्तानच्या कारवायांकडे दुर्लक्ष करतो, तर चीन हा देश जागतिक महासत्ता बनण्याच्या लालसेपायी दहशतवादी कारवाया करणार्‍या पाकिस्तानची पाठराखण करतो.

संसदेवरील हल्ला, कारगील युद्ध, मुंबईवरील हल्ला, मुंबई स्फोट, काश्मीर विधान भवनावरील हल्ला, अक्षरधाम मंदिरावरील हल्ला तसेच दर्ग्यांवरील हल्ले हे पाकिस्तानी षडयंत्र आहेत. १९४८ च्या टोळीयुद्धापासून आज पर्यंतच्या सर्व भारतविरोधी कारवाया, आमच्या सार्वभौमत्वाला आव्हाहने आहेत. सर्व षडयंत्र भारताने हाणून पाडल्याने, पाकिस्तान नव्या योजनांची आखणी करीत आहे.

भारत – पाक सीमेवर जम्मूपासून ५५ कि.मी.अंतरावर, सांबा सेक्टरमध्ये ४०० ते ५०० मीटर लांब आणि ३ मीटर व्यासाचे भुयार सापडले. या भुयारामध्ये ऑक्सिजन नळीही मिळाली, हे भुयार एका पाकी चौकीपर्यंत जोडलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी या भुयाराचा वापर केला असल्याची शक्यता आहे. हे वरकरणी दहशतवाद्यांचे कृत्य वाटत असले तरी यात पाकिस्तान लष्कराचा पर्यायाने पाकिस्तान सरकारचा हात निश्चित आहे. भूमिगत मार्गांनी भारतात घुसखोरी करून दहशतवादी कारवायांना वाढविण्याची पाकची योजना दिसते. आज फक्त एक भुयार निदर्शनास आले, परंतु असे कितीतरी भुयार सीमा भागात असू शकतात, किंवा वापर केलेला असु शकतो.

नवी तंत्राचा वापर करून पाकी दहशतवादी भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण करीत आहेत. पाकिस्तानी सेना आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय. यांचे हे प्रकार असेच सुरु राहिले तर, नजीकच्या भविष्यात आशियायी शांतता निश्चितच धोक्यात येईल. परिणामतः आशियायी देशांतील तणावाला पाकिस्तान कारणीभूत होईल. आम्हा भारतीयांसाठी धोक्याची बाब म्हणजे, भारताच्या सभोवती असणारे राष्ट्र जसे- चीन, म्यानमार (ब्रम्हदेश), बांगलादेश हे भारतविरोधी आहेत. पाकिस्तानचा कुटील डाव ओळखून वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा आमच्या देशाची सुरक्षा निश्चितच धोक्यात येईल.

सहनशीलतेची काही मर्यादा असते, मर्यादा ओलांडून कुरापती काढणाऱ्या पाकला प्रसंगी धडा शिकविण्याची आवश्यकता पडू शकते ! हे सगळे घडत असतांना आम्ही दूरदृष्टीचा अभाव दाखविला तर त्याचेही वाईट परिणाम आम्हाला भोगावे लागू शकतात. आमच्या सहनशीलतेची सर्व देश स्तुती करतात म्हणून, अधिकच सहनशील होण्याची गरज नाही. अफगाणिस्थान भाजून काढणाऱ्या आणि लादेनला पाकच्या भूमित जाऊन कंठस्नान घालणार्‍या अमेरीकेकडून धडा घेण्याची गरज आहे. पाकच्या कटकारस्थानांना शह देण्यासाठी प्रसंगी दबावगट निर्माण करणे सोयीचे ठरू शकते. पोखरण अणुस्फोटानंतर अमेरिकन विरोध आणि आर्थिक बंदीला झुगारणारा भारत, आपल्या प्रभूसत्तेविरोधी कारवायांना कसा काय सहन करू शकतो ?

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..