नवीन लेखन...

पाडगावकरांना पहिलेच पत्र





पाडगावकर तुम्ही अगदी खर सांगून गेलात

प्रत्येकाच्या मनातल गुपित

कस कुपीत साठवून गेलात

मनातल गाण मनात म्हणण्याच लेण घेऊन आलात

आम्ही फक्त जगतो – तुम्ही जगवित आलात

आपलेच अनुभव कुपीत पाहून किती बर वाटत

कोणी तरी मस्त जगतोय यातच सुख वाटत

पाडगावकर तुम्ही अगदी खर सांगून गेलात

माझ प्रेम आगळं हा माझा समज दूर करून गेलात

ते साऱ्यांचच सेम असत ते कळवून

अहं मोडीत गेलात – तुम्ही खर सांगून गेलात

पाडगावकर कस हो अगदी खर सांगून गेलात ?

चिऊताईला दार उघडायला बरोबर सांगून गेलात

’ आपलं माणूस ’ बनून तुम्ही खर सांगून गेलात

डोळे मिटून घेतल्यावर आतमध्ये दिसलात

म्हणणार नाही भास झाला

इथेही तिथला वास आला

अहो पाडगावकर तुम्ही सगळ खर सांगून गेलात

गुलाबी थंडीचे परिणाम होणारच अस ठाम सांगून

डोळ्यात झणझणीत अंजन घातलत

तुमचं काय गेल ? विचारून छान गप्प केलत

पाडगावकर तुम्ही मस्त छान सांगून गेलात

हिरवं पान कधीतरी पिकणारच

पिकलं पान कधीतरी गळणारच

ऐकवून गंभीर करून गेलात

तरी मरतानाही गाणं आठवायला

पाडगावकर तुम्ही बरं सांगून गेलात

पाडगावकर तुम्ही सगळच खरं सागून गेलात

वेंगुर्ल्याच्या पावसाच्या आठवणी जागवून गेलात

मी ही कोल्हापुरात असाच कधी भिजलो होतो

पहिलं वहिलं गाण तिथच

मनात गुणगुणलो होतो

आपलं गाण आपल्यासाठी आपणच गाव

हे गुपित कुपीतून वाटत गेलात

मनाच्या कप्प्यात कुठल्याकुठे शिरलात

आपलं माणूस बनून – सगळ खर सांगून गेलात

पाडगावकर तुम्ही सगळ काही खर सांगून गेलात

— श्री.संजय कात्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..