आपला भारत देश वैविध्यतेने नटलेला देश आहे. देशात धर्म, पंथ, जात यात तर हजारो प्रकार आहेत.. यामुळे देशाची संस्कृती सम्रृध्द होत गेली…
विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून याच संस्कृतीचं जतन करण्याचा प्रयत्न बारी,बाराई, चौरसिया आणि तांबोळी समाज करतो आहे.
बारी,बाराई, चौरसिया आणि तांबोळी पानवाला अशा विविध आडनावांनी ओळखला जाणारा हा समाज संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर देखील विखुरलेला आहे. समाजाला एकसंघ करण्यासाठी आणि संस्कृती जपण्यासाठी एका संकेतस्थळाचीही निर्मिती झाली आहे.
[e-link-ms]पानबेली डॉट इन (www.panbeli.in)#http://www.panbeli.in[/e-link-ms] या संकेतस्थळावर देशभरातील व विदेशातील वधू-वरांची माहिती उपलब्ध असून समाजाची जनगणना,परदेशातील बांधवांशी संपर्क साधणे, आपापसातील संबंध दृढ करणे,देशातील समाज बांधवांचा विकास, रोजगारी आणि समाजाची ओळख अंतरराष्ट्रीय पाताळीवर करून देण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त ठरणार आहे..
खरंतर अशा प्रकारच संकेतस्थळं सर्वच समाजांनी निर्माण केली पाहिजेत. यामुळे या समाजांना आपल्या समाजबांधवांपर्यंत सहजपणे पोहोचता येईल.
अशा संकेतस्थळांचा उपयोग भारतातल्या प्रत्येक धर्म,पंथ आणि समाजाने आपली भाषा,संस्कृती जोपासण्यासाठी सकारात्मकरित्या करायला हवा………. याचा उपयोग नक्कीच येणार्या प्रत्येक पिढीला होइल…
— स्नेहा जैन
Leave a Reply