एका तरुणीन मला प्रश्न केला
सुंदर दिसणं पाप आहे का ?
मी म्हणालो हो पापच असाव …..
नाहीतर सौंदर्यामुळे अनेक निरपराध
स्त्रीयांचा बळी गेलाच नसता नाही का ?
मग ! सुंदर स्त्रियांनी आपले चेहरे
लपवून फिरायचं का ?
मी म्हणालो, नाही त्या पेक्षा पुरुषांतील
लांडग्यास ठेचत सुटायचं….
सुंदर दिसणार्या पुरुषांना त्यांच्या
सौंदर्याचा त्रास होतो का ?
ती म्हणाली, नाही होत ! कारण ते बलशाली असतात ..
त्यावर मी म्हणालो, तसं नाही
स्त्री – पुरुष यांच्या सौंदर्याकडे पाहण्याच्या
भेदामुळे ते होते …
लगेच तिने प्रश्न केला ! ते कसं काय ?
मी म्हणालो, स्त्री सौंदर्याकडे पाहिल्यावर
सुखद वाटते म्हणून पाहते
आणि पुरुष ते सौंदर्य आपल्या
मालकीचे असावे म्हणून पाहतो
त्यामुळेच सौंदर्य पाहणार्या स्त्रीच्या नजरेत
प्रेम आणि पुरुषाच्या नजरेत वासना असते……
मग आता यावर उपाय काय ?
मी म्हणालो, उपाय काय ? एकच
स्त्रियांच्या सौंदर्याकडे वासनेने पहाणार्या
पुरुषांचे स्त्रियांनी डोळेच काढावेत…..
स्वतःचा बळी देण्या पेक्षा बळी घ्यायला शिकावे ….
पण ! कायद्याने ……
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply