नवीन लेखन...

पाय दुखणे

पाय दुखण्याचे कारण सहसा पायाच्या अस्थी आणि स्नायूत असते. कधी कधी अधिक गंभीर आजारांमुळे पायाच्या मज्जातंतूच्या प्लीहा अथवा रक्तवाहिन्या यांच्या आजाराने देखील पायात वेदना येतात. पायातील वेदना अचानक सुरू होऊ शकतात किंवा हे दुखणे हळूहळू सुरू होते. कधी ते दुखणे पायाच्या विशिष्ट भागातच जाणवते, तर इतर वेळा संपूर्ण पायात वेदना होणे संभवते. पायातील वेदना सतत चालू असू शकतात. तसेच त्या अधूनमधून कळा आल्याप्रमाणे देखील जाणवू शकतात. वेदनेत अनेक प्रकार असू शकतात. काही आजारात ही वेदना सतत संथ प्रमाणात होत असते. कधी आग झाल्यासारखे जाणवते, कधी तीव्र वेदना पायाच्या एका टोकापासून दुसरीकडे जाताना जाणवते. पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे अशा प्रकारे देखील त्रास होतो. या वेदनेमुळे व्यक्तीच्या हालचालीत अडचण निर्माण होते. बऱ्याच वेळा शरीराचे वजन पायांना पेलवत नाही. कधी कधी रुग्णाच्या पायाच्या रक्तपुरवठ्यात दोष असतो. अशा व्यक्तीला अकस्मात मोठ्या प्रमाणात पायात वेदना सुरू होणे ही गंभीर घटना असते. पायाला रक्ताचा पुरवठा बंद होऊ शकतो व रक्तवाहिन्यांवर शस्त्रक्रिया करावी लागते अथवा पायाचा काही भाग काढून टाकण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली असते. खुबा, गुडघा, घोटा, पाऊल अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या कारणांनी वेदना होतात. वेदनेचे नेमके कारण शोधणे उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

पायाच्या हाडाचा कर्करोग होतो तेव्हा वेदना सतत चालू असते. ही वेदना रात्री जास्त जाणवते. आजार असतो तेथे सूज येते, रुग्णाचे शरीर वाळू लागते, ताप येऊ लागतो आणि हालचाल अधिकाधिक कठीण होते. कोणताही आघात न होताच हाड मोडते. आघातानंतर होणारा अस्थिभंग अर्थातच खूप वेदना निर्माण करतो. हाड मोडते तेथे सूज येते, भाग काळानिळा पडतो, थोडीसुद्धा हालचाल वेदना असह्य करते, त्या बाजूला शरीराचे वजन पेलवत नाही. अनेकदा हाडाच्या जवळून जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर आणि मज्जातंतूंच्या शिरांवर परिणाम होतो. त्यामुळे मुंग्या येतात, मांडीची स्पंदने होतात. पायाचा रंग बदलतो, त्वचा गार पडते. भाग वाकडा होतो. स्नायूंत गोळे येतात व तो भाग हलला, तर हाडांचे तुकडे एकमेकांत घसून कटकट आवाज येतो.

पायात जीवाणूंमुळे दाह होतो तेव्हा तो भाग सुजतो, तेथे वेदना होतात. अंगात ताप चढतो, नाडीच्या गतीत बदल होतो. भाग लालसर होतो. हातापायाच्या रक्तवाहिन्यांतून स्नायूंना रक्ताचा पुरवठा कमी पडला, तर ते दुखणे चालण्याने वाढते. रात्री हवा गार आली की दुखणे वाढते, पाय गार पडतात, थंड हवा सहन होत नाही. त्वचेवर हलका दाब दिल्यास तेथील केशवाहिन्या रिकाम्या होतात. दाब काढल्यास निरामय प्रकृतीत एक ते तीन सेकंदात या केशवाहिन्या पुन्हा भरतात. रक्तवाहिन्यांत अडथळा झालेला असला, तर अशावेळी रिकाम्या झालेल्या केशवाहिन्या भरावयाला वेळ लागतो. सायटिका हा शब्द वारंवार वापरला जातो. सायाटिका हे आजाराचे नाव नाही. कमरेतून, खुब्याच्या, मांडीच्या मागच्या भागातून पोटऱ्यापर्यंत जाणाऱ्या वेदनेला सायाटिका म्हणतात. अशा प्रकारच्या वेदनेची अनेक कारणे असू शकतात. विश्रांती घेत असताना वेदना कमी होतात, परंतु हालचाल करताना दुखणे वाढते. चालताना व्यक्ती लंगडत अडखळत चालते. बसल्या स्थितीतून उभे राहताना त्रास वाटतो. कधी कधी अकस्मात आलेल्या ताणाचा पाठीवर विपरीत परिणाम होतो. पायात दुखण्याचे व सुजण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पायाची नीला गोठते. माफक गैरसोय होण्यापासून ते तीव्र वेदना होण्यापर्यंत त्रास होऊ शकतो. पाय, पिंढऱ्या सुजतात. पाय गरम होतो. जड झालेला जाणवतो. ताप येतो, हुडहुडी भरते. पायावरच्या नीला फुगतात. दाबल्या तर दुखतात. व्हेरीकोझ व्हेन्समध्ये रात्री पिंढऱ्यांना गोळे येणे असा त्रास बऱ्याच लोकांना होतो. दीर्घकाळ उभे राहिले किंवा चालले तर पोटऱ्या जड होतात. मासिक पाळीच्या दिवसात पाय दुखतात. घोट्याजवळील त्वचा काळी होते. तेथे त्वचा जाड होते, खपल्या पडू लागतात. तेथे मुरुम होते. ही जखम भरून येण्यास खूप वेळ लागतो.

लहान मुलांमध्ये हाडांना चीर पडते. कधी कधी तेथे विषाणूमुळे गळू होते. क्वचित हाडांचा कॅन्सर होतो. मोठ्या माणसांना व लहान मुलांना पायात होणारा एक त्रास म्हणजे कंपार्टमेंट सिंड्रोम. यामध्ये पायात वेदना येते, ती हळूहळू वाढत जाते. स्नायू ताणले की दुखणे वाढते. सांध्याची हालचाल रोखण्यासाठी बांधलेली ड्रेसिंगस्‌ उपयोगी पडतात. ट्रॅक्‍शनमुळे वेदना वाढते. स्नायू कमजोर होतात. पायात मुंग्या येतात, पायांची आग होते. पायातील रक्ताभिसरण व्यवस्थित चालू असते. तथापि आजार वाढल्यावर रक्तवाहिन्यांचे स्पंदन लागेनासे होते. वेदनाशामन औषधांचा उपयोग होत नाही. उलटपक्षी वेदनाशामक औषधांच्या वापराने दुखणे वाढते.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ.ह.वी.सरदेसाई

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

16 Comments on पाय दुखणे

  1. माझे वय 41 असून झोपल्यावर उजवा पाय कंबरेपासून खाली खुपच दुखतो

  2. माझे पाय कमरेपासून तळपाया पर्यत दुखतात उपाय सांगणे

  3. माझ्या मुलाचे वय साडे तीन वर्ष आहे त्याचे पाय सतत दुखतात पाय चोपला तर राहतात पण चोपणे बंद केले तर परत दुखतात हे असे 5 ते 6 महीने चालू आहे काय करावे कृपया सल्ला द्यावा

  4. माझा फक्त उजवा पाय कम्बर पासून पोटरी पर्यंत अतिशय ठणकतो,त्यामुळे असह्य वेदना होतात. उपाय काय करावेत? वय ६४ वर्षे.

  5. सर मि 25 वर्षाची आहे आणि मला 2 baby आहे.. साधारण 1 वर्षांपासून माझे हात पाय खूप दुखते आहे. जड पडते आणि खूप चिडचिड होत आहे. खूप हॉस्पिटल मध्ये गेले मेडिसिन्स घेतल्या पण तरी देखील मला काहीच फरक पडलेला नाही. सर plz यावर मला काहीतरी उपाय सांगा……

  6. सर, माझ्या पत्नीच्या पायांमध्ये मांडीत व पोटरीच्या खाली गड्डे पडल्या सारखे झाले आहे, तसेच संपूर्ण पायात आग होत राहते, ओढल्या सारखे होत राहते,,,,,काही डॉ,v varicose Caine’s आहे म्हणतात तर करी तसे काही नसल्याचे सांगतात,,,,,,,खूप उपाय करून झाले, ,,,,मार्ग सुचवा

  7. माझे वय फक्त 40 आहे आणी रात्री खुपच वाढलेय पेनकिलर घेऊन कंटाळाच आला ऊपाय सांगा प्लीज

  8. खुबा गुडघा खालच्या हाड सूज व दुखत आहे यावर उपाय काय आहे

  9. माझा कमरी पासून उजवा पाय दुखत आहे उभे राहले की खुप दुखतो

    • नमस्कार
      पायाच्या पोटऱ्या दुखत आहेत प्लीज उपाय सांगा

  10. मी मुंबईला राहते आहे मजा गुडघ्याच्या खाली पाय खुप दुखत असते सहा महिनेपासून त्रास होतो आहे मी डॉक्टरकडे गोळी घेत आहे पण मला खायचे फरक नाही पडत नाही ते साठी मला जवळच्या डाळ. पत्ता द्या

  11. नमस्कार सर माझी आई चे पाय तीन महिन्यांपासून रात्री खुप दुखातात एवढे की ती रात्री झोपत नाही खुप रडते
    अनेक डॉक्टर जवळ नेले पण फरक पडला नाही
    याच कारण आणि उपाय सांगितला तर खूप बर होईल

  12. सर माझा पाय गुडघ्याखाली खूपच दुखत आहे. जवळपास 3-4 महिने होत आहे मी डॉक्टरांकडून सल्ला घेत आहे आणि 3-4 महिने झाले continue गोळ्या औषध घेत आहे तरी पण काहीच result नाही आहे. घरचे म्हणतात की गोळ्या औषधी काम नाही करत आहे म्हणजे बाहेरच काही असेल. त्यांनी पण खूप परेशान आहे माझ्याकरतांनी. तर प्लिज मला काही सजेशन द्या. मी चंद्रपूर मध्ये राहते. इकडच्या एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता द्या जेणेकरून माझा पाय लवकरात लवकर बरा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..