आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.
कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.
जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.
१)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.
२)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.
३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.
४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.
६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.
कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply