पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात.
ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप असते.ह्याची पाने आपण स्वयंपाकात वापरतो.ह्या पानांना एक छान ताक्ष्ण सुगंध येतो.
पुदीना हा चवीला तिखट व उष्ण असतो आणी तो शरीरातील वात व कफ दोष कमी करतो.ह्याचा वापर जसा स्वयंपाकामध्ये होतो तसाच तो घरगुती उपचारात देखील केला जातो.
चला तर पाहूयात ह्याचे औषधी उपयोग:
१)वेदना असलेल्या भागावर पुदिन्याची चटणी वाटून तिचा लेप लावावा.
२)नैसर्गिक माऊथवाॅश होय,पुदिन्याचा २ चमचे रस ग्लास भर कोमट पाण्यात घालून गुळण्या करा म्हणजे मुखदुर्गंधी कमी होते.
३)भुक न लागणे,तोंडास रूची नसणे,ह्यात पुदिन्याची चटणी खायला द्यावी.
४)त्वचेवर नायटा झालं असल्यास त्या जागी पुदिन्याच्या पानांचारस लावावा.
५)पोटदूखीमध्ये १ चमचा पुदीना रस+ १ चमचा आल्याचा रस+ १/४ चमचे सैन्धव घालून हे मिश्रण घ्यावे.
ह्याचे जास्त सेवन केल्यास एॅसीडीटी होऊ शकते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply