मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात.आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळा देखील वापरतो.पंजबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहे बुवा पण मला अजुनही तो खायचा योग आला नाही,मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीर देखील सुरेख लागते बरं का.
तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते ही पाहणे गरजेचे आहे.
मुळ्याचे झुडूप असते व मुळा जो पांढरा असतो जमिनीखाली उगवतो तर पाल्याला उगवणा-या शेंगामध्ये बिया असतात.मुळ्याचा पाला हा कडू,खारट व गोड अशा मिश्र चवीचा असमतोल तो शरिरातील कफ आणी वात दोष कमी करतो.
आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)लघ्वीला कमी व बुळबुळीत होत असेल तर मुळ्याच्या पाल्याचा रस १/४ कप सकाळी अनशापोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावा.
२)छोटा मुतखडा असल्यास मुळ्याच्या पाल्याचा रस १/२ कप + १ चमचा धणे पुड नियमीत ६ महिने घ्यावे तो खडी विरघळतो.
३)शौचास काळपट पांढरे होणे,भुक न लागणे,अंग जड होणे अशा तक्रारी मध्ये १/४ कप मुळ्याच्या पानांचा रस+१/४चमचा कळी मिरीपूड रोज दिवसातून ४ वेळेस काही दिवस घ्यावी.
४)संडासला साफ होत नसेल तर मुळ्याच्या पाल्याची भाजी नियमीत जेवणात असावी.
५)वारंवार सर्दी खोकला होत असल्यास २ चमचे मुळ्याच्या पाल्याचा रस+२ चिमूट मिरपुड+ १/४ चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस काहि दिवस घ्यावे.
मुळ्याचा पाला खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास व वारंवार संडासला होते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply