शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.
हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!
चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!
१)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.
२)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.
३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.
५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply