पावसा पावसा नको येऊ दिवसा
रात्रीच्या वेळी ये तू कसा
शाळा क्लासेस मैदानी खेळ
तुझ कौतुक करायला आम्हा नाही वेळ
रात्रीच्या वेळी गोंधळ घाला
झोपु आम्ही पांघरुन शाला
दारं खिडक्या घट्ट लावू
आईच्या कुशीत झोपून जाऊ
अस्सा आपण करु वायदा
प्रयोग करुन बघु यंदा
अमलात आणला प्रस्ताव नवा
सारे देतील तुला दुवा.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply